छत्रपती उदयन महाराजांनी खडा पहाऱ्याचे कौतुक केले

४ जून २०१७ रोजी किल्ले रायगडावर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी त्यांच्या लाखों धारकऱ्यांच्यासह शिवछत्रपतींचे ३२ मण सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापित करण्यासाठी 'हिन्दवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापन संकल्प' केला होता. या दिवशी महाराष्ट्रभरातून लाखो शिवभक्त धारकरी किल्ले रायगडावर पोहचले होते. हे सुवर्ण सिंहासन लोकसहभागातून उभे केले जाणार आहे. जेव्हा हे ३२ मण सुवर्ण सिंहासन किल्ले रायगडावर पुन्हा स्थापित केले जाणार आहे त्यानंतर त्या सिंहासनाच्या सुरक्षेची जबाबदारी ही महाराष्ट्रातील ३६० तालुके वर्षभरातील दररोज एक दिवस प्रमाणे किल्ले रायगडावर त्या सुवर्ण सिंहासनाच्या सुरक्षेसाठी जातील यालाच 'खडा पहारा' असे संबोधले गेले आहे. दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांनी सांगलीत भेट दिली असता उदयन महाराजांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नितीन चौगुले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी नितीन चौगुले यांनी उदयन महाराजांना श्रीरायगडावर होणाऱ्या ३२ मण सुवर्ण सिहासंनाच्या खडा पहारा तुकडी संदर...