महर्षी व्यासांनी दिलेली संधी

आपल्या धर्म ग्रंथातून काय शिकायला हवं ....? महाभारतात महर्षी व्यासांनी एकदा चुकलेल्या लोकांना पुन्हा दिलेली संधी.... एकदा नक्कीच वाचा..... महर्षी व्यासांच्या महाभारतात चुकलेले ऋषी आहेत, चुकलेले राजे आहेत, चुकलेल्या स्त्रिया आहेत, चुकलेल्या माता आहेत. पण व्यासांनी एकदा चूक झाली म्हणून चुकलेल्याला कायमचा गारद ( बाद ) करून टाकले नाही. चूक करूनही प्रत्येकाला आपल्या व्यक्तीत्वाच्या वैशिष्ट्यांने विकासाची ( चूक सुधारण्याची ) संधी दिली आहे. जगात सगळेच चांगले असतं नाहीत. जे चांगले आहेत त्यांचेही सगळंच चांगलं असणे शक्य नाही. तसेच वाईट म्हणून ज्याची अपकिर्ती झालेली असते, त्यांच्यात सुध्दा चांगलेपणाचा काही भाग असतो.. ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर... गुरुर द्रोणपुत्र अश्वत्थामा मारला गेला नसतानाही 'नरो वां कुंजरावो' "अश्वत्थामा मारला गेला" हे मोठ्याने उच्चारले पण त्यानंतर पुढचं वाक्य खालच्या आवाजात म्हटलं ... "मारला गेला तो अश्वत्थामा नसून हत्ती होता " अस म्हणून असत्याचे पाप धुवून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ पांडव पुत्र ... द्रोणांच्या मृत...