भिडे गुरुजींनी तरुणांना हेच शिकवले काय ?

एक भाऊ आपल्या अर्धवट बेशुद्ध बहिणीला कसाबसा सावरत रायगड किल्ला उतरत होता आणि ..... भिडे गुरुजी तरुणांना चुकीच्या मार्गावर नेतात असा आरोप काही विशिष्ट लोकांकडून नेहमी होत असतो. अशा वेळी सत्य काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न फारच कमी लोक करत असतात. यंदाच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच तिथी नुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावर पावसाने दोन दिवस जोरदार हजेरी लावली होती. मात्र सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे गडावर येणाऱ्या शिवभक्तांची संख्या कमी झाली नव्हती. अगदी ५ वर्षाच्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध शिवभक्तांनी रायगडावर आपल्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकास हजेरी लावली होती. राज्याभिषेक झाल्यावर शिवभक्त रायगड उतरत असताना कोणा अज्ञात इसमाने बातमी पसरवली की 'रायगडावरील धबधब्यामुळे वाट वाहून गेली आहे' या चुकीच्या बातमीमुळे पोलिसांनी रायगडाचा महादरवाजामधील मुख्य प्रवेशद्वार बंद केले. रायगड उतरत असणाऱ्या लोकांची महादरवाजा येथे गर्दी होऊ लागली. ६ जूनला चुकीच्या नियोजनामुळे झालेली चेंगराचेंगरी पोलिसांनी लक्षात घेउन दरवाजा बंद करण्याचे उचललेले पाऊल आणखी गोंधळ निर्माण...