मनुस्मृतीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरच स्तुती केली होती काय ?

स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणजे ... मुळ लेख फेसबुकवरील असून तो आहे तसा इथे मांडण्यात आला आहे याची नोंद घ्यावी ! कालपासून माझ्या एका फेसबुक पोस्टवर एक गृहस्थ मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याविषयी वाद घालत होते म्हणू किंवा चर्चा करत होते असं म्हणू. त्यांना मी स्पष्टपणे सांगितले की, "मी श्रीशिव - श्रीशंभूचरित्राचा अभ्यासक आहे. मनुस्मृती याबाबत माझा अभ्यास नाही" चर्चा करत असताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीबद्दल काय म्हणाले होते यावरील अभ्यासू धारकरी श्री. तुकारामदादा चिंचणीकरांचा लेख त्यांना पाठवला. त्यावर त्या गृहस्थांनी "दळवी तुम्ही दुसऱ्याचे लेख देता आणि स्वतः अभ्यासक आहात असं म्हणता " असं म्हणत मला खिजवण्याचा प्रयत्न केला. मी हातातील शिवचरित्र अभ्यास काहीवेळ बाजूला ठेवून खरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं आहे हे वाचण्यासाठी माझ्या संग्रहातील डॉ. बाबासाहेबांची काही पुस्तके वाचायला घेतली. खर तर माझा अभ्यासाचा विषय हा 'शिवछत्रपती आणि संभाजी महाराज' पण काल त्या गृह...