मनुस्मृतीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरच स्तुती केली होती काय ?

स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणजे ... 

मुळ लेख फेसबुकवरील असून तो आहे तसा इथे मांडण्यात आला आहे याची नोंद घ्यावी !

           कालपासून माझ्या एका  फेसबुक पोस्टवर एक गृहस्थ मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याविषयी वाद घालत होते म्हणू किंवा चर्चा करत होते असं म्हणू. त्यांना मी स्पष्टपणे सांगितले की,  "मी श्रीशिव - श्रीशंभूचरित्राचा अभ्यासक आहे. मनुस्मृती याबाबत माझा अभ्यास नाही"

चर्चा करत असताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीबद्दल काय म्हणाले होते यावरील अभ्यासू धारकरी श्री. तुकारामदादा चिंचणीकरांचा लेख त्यांना पाठवला. त्यावर त्या गृहस्थांनी "दळवी तुम्ही दुसऱ्याचे लेख देता आणि स्वतः अभ्यासक आहात असं म्हणता " असं म्हणत मला खिजवण्याचा प्रयत्न केला.
मी हातातील शिवचरित्र अभ्यास काहीवेळ बाजूला ठेवून खरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं आहे हे वाचण्यासाठी माझ्या संग्रहातील डॉ. बाबासाहेबांची काही पुस्तके वाचायला घेतली. खर तर माझा अभ्यासाचा विषय हा 'शिवछत्रपती आणि संभाजी महाराज' पण काल त्या गृहस्थाने 'तुमचा अमुक अभ्यास नाही' असं म्हणत मला डिवचल्यामुळे  मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचायला घेतली त्यातील एक पुस्तक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत प्रसिद्ध पुस्तक Riddles in Hinduism म्हणजेच हिंदुत्वाचे कुटप्रश्न
हे पुस्तक वाचत असताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी  मनुस्मृतीवर टिका केलीय  तर अनेक ठिकाणी  मनुच्या नियमाबद्दल गौरवोद्गार देखील काढले आहेत   हे वाचनात आले.

उदा. 'सक्तीचा विवाह' या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजातील व्यक्तीच्या विवाहाबद्दल मनू काय म्हणतो हे लिहितात. मनुने ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ संन्यास या चार आश्रमाचे काही नियम केले आहेत त्यावर बाबासाहेब लिहितात,
"मनुच्या पुर्वी याबाबत जे नियम अस्तित्वात होते ते पाहता मनूने केलेले बदल क्रांतिकारक होते.   ( पान क्रमांक २२१ ) 
'वसिष्ठ धर्मसुत्रे व गौतमसुत्रे' यांत सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्याश्रम ही अवस्था संपल्यावर कोणता आश्रम स्वीकारावयाचा याची निवड त्या त्या व्यक्तीनेच करावयाची आहे. त्याला वाटेल तर तो विवाह करील व गृहस्थाश्रमी होइल. आणि त्याला वाटेल तर तो संन्यासी होइल. विवाह करणार नाही. वैवाहिक अवस्था ही वानप्रस्थ वा संन्यास यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक अवस्था आहे व ती सक्तीची आहे हा मनूने केलेला क्रांतिकारीबदल आहे ही गोष्ट स्पष्ट आहे . ( पान क्रमांक २२१ )

वरील दोन्ही उदाहरणे मी स्वतः वाचलेली आहेत त्यामुळे त्याची सत्यता मी तपासूनच घेतली आहे. आणि त्या गृहस्थांचे मी आभार मानीन की मला हा विषय स्वतः अभ्यासण्यास भाग पाडले म्हणून हे सत्य मला समजले.
या पुस्तकात अनेक ठिकाणी हिंदू धर्मातील अनेक चुका सांगितल्या आहेत. अनेक धर्मग्रंथांवर टिका प्रश्न उपस्थित केले आहेत ....

पण .....

पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे यात स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी मनुस्मृतीची स्तुती केलीय हे आता नाकारता येणार नाही ! आणि कोणी नाकारु पाहिल तर त्याला भविष्यात मी स्वतः उत्तर देऊ शकेन हे आता निश्चित आहे !

त्या गृहस्थांना आता वाटत असेल की, 'पुर्वी दळवी फक्त शिवचरित्राचाच अभ्यास करत होता तेच बरे होते .....'
यालाच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणतात !

                                            - बळवंतराव दळवी

टिप -
स्वत: संदर्भ ग्रंथ, पुस्तके अभ्यासणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनी ओळखा ही विनंती आहे !
- वरील लेख हा मूळ लेखकाच्या परवानगीने इथे प्रसिद्ध केला आहे. वरील मताशी आम्ही Blogधारक सहमत आहोतच असे नाही !
©सर्व हक्क लेखकाधिन

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??