हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??
हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??
शिवकालातील तुळजाभवानी आणि एकवीरा आईचा उल्लेख
शिवछ्त्रपतींच्या आज्ञेवरून लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथातील ही काही उदाहरणे ...
पौराणिकानां प्रवरं भट्टगोविन्दनंन्दनम |
एकवीराप्रसादेन लब्धवाकसिध्दिवैभवम ||
अध्याय १ श्लोक क्र. ६
अर्थ -
पौराणिकांचा मुकुटमणी, एकवीरा देवीच्या कृपेने वाक्सिसिध्दिवैभव प्राप्त झालेला.
य: शास्ति वसुधामेतां राजा राजगिरीश्वर : |
तुलजाया: प्रसादेन लब्धराज्यो महातपा: ||
- अध्याय १ श्लोक क्र. ११
अर्थ -
जो राजगडाचा अधिपती राजा ह्या पृथ्वीवर राज्य करित आहे, तुळजाभवानीच्या प्रसादानें ( आशीर्वादाने ) ज्याला राज्यप्राप्ती झाली आहे, जो महातपस्वी आहे.
देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तक: |
प्रपन्नानां परित्राता प्रजानां प्रियकारक : ||
- अध्याय १ श्लोक क्र. १५
अर्थ :-
देव ब्राह्मण आणि गाई यांचा त्राता, दुर्दम्य यवनांचा काळ, शरणागतांचा रक्षक, प्रजेचे प्रिय करणारा अशा त्या शिवाजी राजाचे चरित्र.....
एकवीरां भगवतीं गणेशं च सरस्वतीं |
सदगुरुं च महासिध्दं सिध्दनामपि सिध्दिदम ||
प्रणिपत्य प्रवक्ष्यामि महाराजस्य धीमत: |
चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम ||
- अध्याय १ श्लोक क्र. ३६ ते ४१
अर्थ -
भगती एकवीरा, गणपती, सरस्वती आणि सिध्दांना सुद्धा सिध्दिदाता महासिध्द सदगुरु यांना प्रणिपात करून भरतवंशाच्या भारताप्रमाणे असलेले बुध्दिमान शिवाजी महाराजांचे चरित्र मी कथन करतो .
ही झाली काही वर्णने ....
ज्यांना आणखी अभ्यास करायचा आहे किंवा पुरावा हवा आहे त्यांनी ....
अध्याय क्र. १८ श्लोक क्र. १९ यातील अफजलखानाने तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा मुर्तीचा अपमान केला होता हा उल्लेख वाचा !
अध्याय २० यातील अफजलखान वध प्रसंगावेळी शिवछत्रपतींना भवानी मातेने दिलेला दृष्टांत पहा.
अध्याय २६ श्लोक क्र. ४२ - ४४ यातील शिवछत्रपती पन्हाळगडावर अडकलेले असताना त्यांना भवानीमातेने दिलेला दृष्टांत पहा.
शिवछत्रपतींचे नाव घेउन हिंदू धर्मावर टिका करणाऱ्यानी आधी हे तपासावं मग याव आमच्याशी वाद घालायला ! आणि हिंदू धर्म विरोध करणारे काय बोलतात यापेक्षा शिवछत्रपतींच्या काळातील हा उल्लेख शिवभक्तांसाठी जास्त महत्वाचा आहे.
आपला
बळवंतराव दळवी
© divyadrushti 2023
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा