या शिलालेखात सम्राट अशोक काय लिहितात ?

सम्राट अशोकांचा ९ वा शिलालेख हा शिलालेख इ.स. पुर्व ( ख्रिस्त पुर्व ) ३ ऱ्या शतकातील आहे. मुंबई जवळ असणाऱ्या अत्यंत प्राचिन सोपारा ( आजच्या विरार जवळील नालासोपारा ) या ठिकाणचा हा शिलालेख आहे ! सोपारा ( आजचे नालासोपारा ) याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आजही उपलब्ध आहेत. सदर शिलालेख हा इ. स. पुर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मप्रचारासाठी मौर्य ब्राम्ही लिपीत लिहिलेला आहे. यात असं लिहिल आहे की, सम्राट अशोक असे म्हणत आहे की.... "रोगराई, विवाह, जन्म, यात्रा याप्रसंगी सामान्य ( हिंदू ) माणसे अनेक धार्मिक विधी करतात. ( धार्मिक विधी फक्त हिंदू धर्मात होतात ) अशावेळी माता आणि पत्नी अनेक धार्मिक विधी करतात. ( हिंदू स्त्रिया आजही हे करतात ) शिलालेखात सम्राट अशोक पुढे लिहितात ... " … धार्मिक विधी निश्चित कराव्यात ( अस अशोक सम्राट म्हणतात ) पण याच्या सोबतच ( धार्मिक विधी सोबतच ) सदाचाराचे फळ चांगले मिळते. ( सदाचार म्हणजे चागले आचार / विचार ) पुढे लिहिल आहे की ... बंदी, दास - दासी यांना माणुसकीने वागविणे. ज्येष्टांचा आदर करावा पशुपक्षांवर दया दाखवणे....