या शिलालेखात सम्राट अशोक काय लिहितात ?

सम्राट अशोकांचा ९ वा शिलालेख

हा शिलालेख इ.स. पुर्व ( ख्रिस्त पुर्व ) ३ ऱ्या शतकातील आहे.  मुंबई जवळ असणाऱ्या अत्यंत प्राचिन  सोपारा ( आजच्या विरार जवळील नालासोपारा ) या ठिकाणचा हा शिलालेख आहे ! सोपारा ( आजचे नालासोपारा ) याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आजही उपलब्ध आहेत.

सदर शिलालेख हा इ. स. पुर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मप्रचारासाठी  मौर्य ब्राम्ही लिपीत लिहिलेला आहे.

यात असं लिहिल आहे की,
सम्राट अशोक असे म्हणत आहे की....

"रोगराई, विवाह, जन्म, यात्रा याप्रसंगी सामान्य ( हिंदू ) माणसे अनेक धार्मिक विधी करतात. ( धार्मिक विधी फक्त हिंदू धर्मात होतात ) अशावेळी माता आणि पत्नी अनेक धार्मिक विधी करतात. ( हिंदू स्त्रिया आजही हे करतात )

शिलालेखात सम्राट अशोक पुढे लिहितात ...

" …धार्मिक विधी निश्चित कराव्यात  ( अस अशोक सम्राट म्हणतात  ) पण याच्या सोबतच ( धार्मिक विधी सोबतच ) सदाचाराचे फळ चांगले मिळते.  ( सदाचार म्हणजे चागले आचार / विचार )

पुढे लिहिल आहे की ...

बंदी, दास - दासी यांना माणुसकीने वागविणे. ज्येष्टांचा आदर करावा पशुपक्षांवर दया दाखवणे.   ब्राह्मण आणि श्रमणांप्रति औदार्य असणे  ही सदाचाराची कामे आहेत ....

सम्राट अशोक सांगतात...

...ब्राह्मण आणि श्रमणांप्रति औदार्य बाळगा अस म्हणतात

आता मला सांगा सम्राट अशोकांचा वारसा सांगणारे कितीजण सम्राट अशोकांचे हे मत मानतात ?

सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म वाढवला असे म्हटले जाते. त्याच अशोकांचे दुसरे मत असे की, ब्राह्मणांप्रति औदार्य ( आदर ) दाखवा हे सदाचाराचे काम आहे.

सरसकट ब्राम्हणांवर टिका करणाऱ्या त्या मुर्ख लोकांना सम्राट अशोकांचे हे सदाचाराचे काम पटतयं काय ? की स्वतःचेच खरं करण्याच्या किंवा कोणीतरी बोंबलतयं म्हणून आपणही बोंबलायचं या नादात सत्य नाकारतोय ?

आता असं म्हणू नका की हा शिलालेख खोटा आहे म्हणून ... हा शिलालेख आजही तुम्हाला मुंबईतील छत्रपती श्रीशिवाजी महाराज संग्रहालयात पहायला मिळेल फक्त डोळे उघडे ठेवण्याची आणि  तो शिलालेख वाचण्याचा मनाचा मोठेपणा तुमच्या जवळ असायला हवा !

प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे 'वाचाल तर वाचाल !' म्हणून हा शिलालेख जरी ब्राम्ही लिपीतील असला तरी त्याचे मराठी भाषांतर उपलब्ध आहे. तो नक्की वाचा आणि आपण सर्व मिळून सम्राट अशोक म्हणतात तसं ब्राह्मण आणि श्रमणांप्रति आदर दाखवून सदाचाराची कामे करुयात !

                       आपला
            © बळवंतराव दळवी

सर्व हक्क लेखकाधीन
=======

आमचे Youtube वरील video लिंक 

https://youtube.com/c/BalwantraoDalvi


१) ब्रिगेडींची बोलती बंद करणारा रायगडावरील शिलालेख

 https://youtu.be/7HblA-M77f4


२) रायगडावरील बाजारपेठ की नगरपेठ 

https://youtu.be/cDU9juxvi-k


३) मशीद मोर्चा की मदार माची ?

https://youtu.be/74r3TTfRCUI


४) रायगडावरील श्रीशिवसमाधीचा शोध 

https://youtu.be/9xUTBvi2v54


५) जिथे शिवछत्रपतींनी अंतिम श्वास घेतला

 https://youtu.be/LedS7U0Zonc

===================

Copyright © 2018 All right reserved

टिप्पण्या


  1. खूप उत्तम आणि महत्वपूर्ण माहिती आहे दादा

    उत्तर द्याहटवा
  2. दादा आज काहीतरी नवीन माहिती वाचायला मिळाली.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. ब्राम्हण वेगळे आणि भट समाज वेगळा आहे, ब्राम्हण हा आध्यात्मिक शब्द भटांनी चोरला तो जातीवाचक केला !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??