भिडे गुरुजींच्या विरोधकांना कोर्टाची चपराक !

विषय दंड भरण्याचा नव्हता ... विषय होता न केलेला गुन्हा मान्य करुन आपण असत्याला सत्य का म्हणायच ? १६ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईत शिवडी येथे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या शिवचरित्र आणि सुवर्ण सिंहासनसंदर्भात व्याख्याना वेळी काही संघटनांनी भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या सुचनेनुसार उघड्या मैदानावर व्याख्यान न घेता शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी बंदिस्त सभागृहात हे व्याख्यान घेतले होते. या व्याख्यानात हजारांच्या आसपास शिवभक्त उपस्थित होते. या व्याख्यानासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग कार्यालयातून रितसर पैसे भरून परवानगी घेण्यात आली होती. बंदिस्त सभागृहात व्याख्यान असल्याने पोलिसांनीही सहकार्य केले होते. व्याख्यान तीन तास सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी रफी अहमद किडवाई पोलिसांचे आभार मानण्यासाठी एक आभार पत्र पोलिसांना दिले. कायदेशीर मार्गाने आदरणीय भिडे गुरुजींचे आयोजित व्याखानाला विरोध केला होता त्या भीम आर्मी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारत एकता मिशन यांच्या विरोधात पोलि...