भिडे गुरुजींच्या विरोधकांना कोर्टाची चपराक !

विषय दंड भरण्याचा नव्हता ... विषय होता न केलेला गुन्हा मान्य करुन आपण असत्याला सत्य का म्हणायच ?

१६ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईत शिवडी येथे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या शिवचरित्र आणि सुवर्ण सिंहासनसंदर्भात व्याख्याना वेळी काही संघटनांनी भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या सुचनेनुसार उघड्या मैदानावर व्याख्यान न घेता शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी बंदिस्त सभागृहात हे व्याख्यान घेतले होते. या व्याख्यानात हजारांच्या आसपास शिवभक्त उपस्थित होते.  या व्याख्यानासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग कार्यालयातून रितसर पैसे भरून परवानगी घेण्यात आली होती. बंदिस्त सभागृहात व्याख्यान असल्याने पोलिसांनीही सहकार्य केले होते.
व्याख्यान तीन तास सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी रफी अहमद किडवाई पोलिसांचे आभार मानण्यासाठी एक आभार पत्र पोलिसांना दिले. कायदेशीर मार्गाने आदरणीय भिडे गुरुजींचे आयोजित व्याखानाला विरोध केला होता त्या भीम आर्मी, बहुजन  रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारत एकता मिशन यांच्या विरोधात पोलिसांना निवेदन दिले गेले होते. त्यावर पोलिसांनी 'तुमच्या निवेदनावर आम्ही विचार करु' असे धारकऱ्यांना सांगितले.
२०१८ च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या व्याख्यानानंतर तब्बल ८ महिन्यांनी ऑगस्ट २०१९ ला  रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी लालबाग विभागातील धारकरी नीरज भोसले यांना फोन करून असे कळविले की,
"उद्या कोर्टात हजर रहा ... तुमच्या विरोधात तक्रार असल्याने तुमच्यावर केस दाखल केली गेली आहे."
नीरज भोसले यांनी शिवप्रतिष्ठानचे मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांना याबद्दलची माहिती कळवली. दुसऱ्या दिवशी कोर्टात नीरज भोसले यांच्या सोबत मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी आणि लोअरपरळचे धारकरी पुरुषोत्तम बाबर कोर्टात पोहचले असता पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, "तुम्ही गेल्या वर्षी आयोजित केलेल्या व्याख्यानाला काही संघटनांनी तुमच्या विरोधात तक्रार केली होती, तुम्ही भिडे गुरुजींचे जे व्याख्यान घेतले होते तेव्हा पोलिसांची परवानगी घेतली नाही असे तुमच्या विरोधकांचे मत आहे. तुमच्यावर गुन्हा नोंद झाला आहे तेव्हा न्यायालय जो फाईन सांगितील तो भरून टाका आणि विषय संपवा"
जे व्याख्यान कायदेशीर मार्गाने रितसर पैसे भरून घेतले होते त्याविरोधात कोणीतरी खोटी तक्रार केली म्हणून त्या व्याख्यानाला पोलीस बेकायदेशीर ठरवू पहात होते आणि खोटा गुन्हा नोंदवून .... गुन्हा मान्य करा.. फक्त पाचशे रुपये दंड आहे !" असे म्हणत होते ...
आदरणीय भिडे गुरुजींचे धारकरी खोटा गुन्हा मान्य करतीलच कसे ? कर नाही त्याला डर कशाला ? विषय फक्त ५०० रुपये दंड भरण्याचा नव्हता,  विषय होता चुकीचा खोटा गुन्हा मान्य का करायचा ? कोणासाठी ? आदरणीय भिडे गुरुजींच्या विरोधकांना खूश करण्यासाठी पोलिस असे करत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला ?
भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी दंड भरण्यास नकार दिला. "आम्ही तेव्हाही रितसर पैसे भरून बंदिस्त सभागृहात आदरणीय गुरुजींचे व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यानासंबधी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असता त्यांनी निवेदन न घेता ...  वरिष्ठ पोलिस निरीक्षक बनसोड साहेबांनी  "ठीक आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करू !" असे सांगितले होते.'
चुकीचा गुन्हा मान्य करायचा नाही असे धारकऱ्यांनी ठरवले आणि आपली सत्याची बाजू मांडण्यासाठी मुंबईत धारकऱ्यांसाठी सदैव धावून जाणाऱ्या मुंबई हायकोर्टाचे अधिवक्ता श्री. दास यांना याबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यांनी केसचा अभ्यास करून कोर्टात केस डिसचार्ज करण्यासाठी अपिल केले..... न्यायाधीश साहेबांसमोर धारकऱ्यांची न्यायाची बाजू मांडली. "त्या व्याख्यानाला रितसर पैसे भरून महानगर पालिकेची परवानगी घेतली होती. घटना घडली डिसेंबर २०१८ ला आज ८ महिन्यांनंतर ऑगस्ट २०१९ मध्ये त्याविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करून गुन्हा कसा काय नोंद होऊ शकतो ?" असा युक्तिवाद Adv. दास यांनी करत न्यायाधीशांकडे न्यायाची मागणी केली.....
न्यायाधीशांनी सर्व बाजू तपासल्यानंतर आदरणीय भिडे गुरुजींच्या व्याख्यान विरोधातली केस फेटाळली आणि धारकऱ्यांना दिलासा दिला ...
जय शेवटी सत्याचाच होतो ... धर्माच्या न्यायाच्या बाजूने जो उभा राहतो विजय त्याचाच होतो ...  आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या विरोधात खोटे गुन्हे नोंद करणाऱ्या विरोधकांना या सगळ्या प्रकरणात न्यायालयाने मोठी चपराक दिली आहे ! अशी माहिती मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिली.
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??