कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती ? काय आहे सत्य ?

१ जानेवारी १८१८ च्या कोरेगाव - भीमा लढाईत पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे. कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली ५०० महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली, त्यामुळे त्यांचा १८१८ च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही . असा दावा पाटील यांनी केला आहे. गेले पाच महिने आपण जयस्तंभाश...