दलवाईं तुमचे डोके ठिकाणावर आहे काय ?

नाणार - आरे यातील आंदोलन आणि भीमा कोरेगावची हिंसक दंगल दोन्ही एकच कसे ? 

महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेले सरकार हे जरी शिवसेनेच्या मुख्यमंत्री नेतृत्वाखाली उभं राहिलेले असले तरी त्याला अनेक पक्षांनी टेकू दिला आहे. जो तो पक्ष आपआपला स्वार्थ काढून घेण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मग ते पद असो की त्यांचा छुपा अजेंडा .....

ऐकेबाजुला कॉंग्रेस - राष्ट्रवादी असे सर्वधर्मसमभाव मानणारे पक्ष तर दुसरीकडे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना असं पूर्णपणे विरूध्द विचारांची ही आघाडी किती दिवस टिकेल हा प्रश्न आहेच .... पण जितके दिवस टिकेल त्यातही आपला मुद्दा आपला स्वार्थ कसा काढून घेता येइल यावरच भर असेल असेच वाटत आहे ...

अशावेळी जितेंद्र आव्हाड आणि हुसेन दलवाई आपल्या मागण्या घुसवत पुढे आलेले दिसून आले. या दोघांनी नाणार आणि आरे आंदोलकांवरील ठाकरे सरकारने मागे घेतलेल्या गुन्हाच्या हवाला देत भीमा - कोरेगाव दंगल प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. यावेळी हुसेन दलवाईसारख्या बुजुर्ग राजकारणी व्यक्तीकडे पाहून विचार येतो की,  नाणार - आरे यातील आंदोलक आणि भीमा कोरेगावची हिंसक दंगल दोन्ही एकच कसे ? भीमा - कोरेगावच्या दंगलीत एका निष्पाप मराठा तरुणाची हत्या केली गेली कारण काय तर त्याने श्रीशिवछत्रपतींचा फोटो असेला जॅकेट घातला होता म्हणून त्याला दगडाने ठेचून मारले गेले होते हे हुसेन दलवाई विसरले की काय ? आरे मधील झाडे वाचवा यासाठी आंदोलन करणाऱ्यानी कोणाचा जीव घेतला होता काय ? नाही ना ? मग दलवाई या दोन आंदोलनाची बरोबरी करतातच कसे ????

आपली सत्ता आली म्हणून दलवाई काहीही मागणी करणार आहेत काय ? शिवसेनेला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी शांत झालेले कोरेगाव भीमा प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न आहे असे मत श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगली कार्यवाहक श्री.नितीन चौगुले यांनी व्यक्त केले आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांना शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची युती रुचलेली नाही. त्यामुळे येन-केन प्रकारे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. शांत झालेले कोरेगाव भीमा प्रकरण उकरून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. वास्तविक महाराष्ट्रात शांतता असलेली या लोकांना पाहवत नसल्याने जाणीवपूर्वक सूत्रे पुढे आणून हुसेन दलवाई, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे लोक महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतात. कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजीराव भिडे गुरुजी यांची चौकशी झाली असून ते यापुढेही होणार्‍या चौकशीला सामोरे जाण्यास नेहमीच सिद्ध आहेत. चौकशी आयोगाचा जो निर्णय असेल, तो त्यांना मान्य असेल; असेही त्यांनी स्पष्ट केलेले असताना पुन्हा एकदा ६ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या तोंडावर महाराष्ट्रात जातीय दंगली भडकावून मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा डाव असावा अशा घडामोडी सध्या महाराष्ट्रात सुरु झाल्या आहेत.

कोरेगाव भीमा प्रकरणात भिडे गुरुजींवर आरोप करणारे या प्रकरणातील चौकशी आयोगासमोर जाऊन का तक्रार देत नाहीत ? समाज माध्यमासमोर मत मांडून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे कारणच काय ? असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वी भिडे गुरुजी यांच्यावर आरोप करणारे प्रकाश आंबेडकर यांनीही चौकशी आयोगासमोर भिडे गुरुजी यांच्यावर आरोप  केले नाहीत न कोणतेही पुरावे सादर केले. यावर पत्रकारांनी विचारले असता प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना  "सभेत आरोप करणे आणि प्रत्यक्ष आयोगासमोर सांगणे यात फरक असतो" असे सांगितले होते. त्यामुळे  भिडे गुरुजींवर होत असलेले आरोप हे केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच करण्यात येत आहेत हे स्पष्ट दिसत आहे .

  कोणते गुन्हे मागे घ्यायचे कोणते नाही हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नक्कीच माहित आहे ...आंदोलन आणि दंगल यातील फरक दलवाईंना नक्कीच समजत असेल.. इतके वर्षे राजकारणात असूनही जर हे दलवाई यांना समजत नसेल तर दलवाई यांचे डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न पडतो....




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??