संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ... होय हत्याच आणि तीही अमानुष हत्या औरंगजेबाने केली हे सर्वश्रुत आहेच... आता संभाजी महाराजांच्या बलिदानाचा माझ्यासारखा एक सामान्य माणूस इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, आपल्या मराठी इतिहासात म्हणजे संभाजी महाराजांच्या समकाळातील इतिहासात आपल्या लोकांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल काहीच लिहून ठेवलेले नाही. जे मुळ लिखाण उपलब्ध आहे ते औरंगजेबाच्या दरबारातील खाफिखान ... साकी मुसैदखान .... ईश्वरदास नागर ... यासारख्या औरंगजेबाच्या पदरी असलेल्या लोकांनीच संभाजी महाराजांच्या अंतिम क्षणाबदल लिहून ठेवले आहे आणि आज ते उपलब्धही आहे. तुम्ही म्हणाल असं कसं चिटणीस बखर वैगरे मध्ये लिहिले आहे की ... तर मित्रांनो चिटणीस बखर ही मुळातच शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर १०० - १५० वर्षांनंतर लिहिली आहे हे आपण समजून घ्यायला हवे ! एक साधा विचार करा ... औरंगजेबाच्या दरबारात त्याचे उर्दु फारसी लेखणीक असतील की आपले मराठी लेखनकार असतील ? समजलं का काही ? छान ..... म्हणजे आता तुमच्या डोक्यात हा...