भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानमध्ये दलित आणि बौध्द तरूणही ?

२०१४ साली मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना किल्ले रायगडावर आमंत्रण देणारे  'भिडे गुरुजी' त्यानंतर संपूर्ण देशाला माहित झाले.

 महाराष्ट्रात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची शिवभक्तांची संघटना चालवणाऱ्या भिडे गुरुजींच्या प्रतिष्ठानमध्ये मराठ्यांपासून सर्व जातीतील तरुण आणि वयोवृद्ध कार्य करतात हे समजल्यावर थोडी आणखी माहिती मिळते का हे पाहण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी काही धारकऱ्यांशी बातचीत केली तेव्हा एक आगळीवेगळी माहिती हाती लागली.

शिवछत्रपतींचे गडकिल्ले कसे पहावेत. त्यांच्याशी कसा संवाद साधावा हे आपल्या लेखणीतून मांडणारे एक गडवेडे, ज्यांनी किल्ल्यांवर जितकं प्रेम केले त्यापेक्षा जास्त कशावरही केले नाही असे शिवप्रेमींचे लाडके आप्पा  म्हणजेच गो. नी. दांडेकर.  त्यांनी गडकोटांवर, त्यांच्या अनुभवावर अनेक पुस्तके लिहून हातावेगळे केले आहेत. अशा गडतपस्वी कै. गो. नी. दांडेकर यांनी १९८३ साली लिहिलेल्या 'दुर्गभ्रमणगाथा' या पुस्तकात संभाजीराव भिडे गुरुजींबद्दल लिहिताना ते म्हणतात...

"आमच्या संभाजी भिड्यांचं पत्र आलं. 'सांगली जिल्ह्यातून चारशे जवान घेऊन राजगड मार्गे रायगड वारी करायची आहे ! ..... गडावर पोहचून चोरदिंडीच्या माथ्यावर उभा राहिलो. जसजसा दिवस चढू लागला तसतसे गडावर सर्व मार्ग माणसांनी भरभरून वाहू लागलें...... एकेक येउन गडावर पोहचू लागला. कुणी विद्यार्थी, कुणी शिक्षक, कुणी प्राध्यापक, कुणी कारखानदार, कुणी मजूर कुणी शेतकरी, कुणी सोनार, सुतार, कुणी बौद्ध तर कुणी दलित .... तासा दिड तासांनी संभाजीराव पोहचले."

गडतपस्वी कै. गो. नि. दांडेकर यांनी १९८३ साली  लिहिलेली ही माहिती वाचनात आल्यानंतर ती पडताळून पाहण्यासाठी आम्ही अनेकांना भेटलो. काही सांगली - पुण्यातील, तर काही मुंबईसारख्या शहरातील तरुणांशी याबद्दल माहिती घेतली.


एकट्या मुंबईतच आम्हाला मराठा, दलित, बौद्ध, कोळी, आगरी, ब्राह्मण, वाणी, ढोर, चांभार, धनगर अशी वेगवेगळ्या जातीतील  समाजातील तरुण आमच्या प्रतिनिधीना भेटले. त्यांची नावे आम्ही लिहू नये अशी त्यांनी विनंती केली पण ती विनंती ऐकून आम्हालाही त्यांचा हेवा वाटला. ती विनंती अशी होती की,

"आदरणीय भिडे गुरुजींनी आम्हाला कधी जातपात शिकवली नाही न कधी आम्हाला आमची जात विचारली. त्यामुळे आम्ही कोणत्या जातीचे आहोत यावरून आमच्या धारकऱ्यांमध्ये कधी चर्चा होत नाही. त्यामुळे आम्ही जे एकमेकांशी जोडले गेले आहोत त्यात जातीला प्राधान्य नाही. तरीही तुम्ही आम्हाला माहिती विचारली म्हणून आम्ही ती सांगितली.  धारकऱ्यांकडे अमुक एक जातीचा म्हणून पाहण्याची आमच्यात पद्धत नाही. आदरणीय भिडे गुरुजींनी आम्हाला तशी शिकवण कधीही दिली नाही. "

@ http://divyadrushti.blogspot.com/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??