हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव....

 कुठली फालतू कॉमेडियन पिलावळ उठसुठ देशाच्या राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक बोलून तर कधी हिंदू देवदेवतांची टिंगळ टवाळी करत विनोद करुन पैसे कमावण्यासाठी वाट्टेल ते जोक करतात. त्यांचे video सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यांच्यावर तात्काळ कारवाई न करता महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब असं म्हणतात की,
"त्या कॉमेडियनवर कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घेण्यात येइल. चौकशी मध्ये जर दोषी आढळून आल्यास तर कारवाई केली जाईल !"

पण .... दुसरीकडे मात्र शिवछत्रपतींच्या प्रेमापोटी शिवभक्तांनी रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरुन त्या कॉमेडियनला प्रतिउत्तर दिले तर शिवभक्तांवर ताबडतोब कारवाई करण्यात आली.  पण ज्यांनी शिवछत्रपतींचा अवमान जाहिररित्या केला, ज्यांचे आक्षेपार्ह Video अजूनही Youtube वर सर्रासपणे पाहिले जात आहेत त्यांच्या वक्तव्यांची चौकशी केल्यानंतर कारवाई होणार ???  याचसाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीने शिवसाम्राज्ययात्रा काढलेली काय ? जे डोळ्यांनी दिसत आहे त्यापैकी एकावर कारवाई आणि
दुसऱ्याला मात्र अजूनही मोकाट सोडून चौकशीचे आदेश ? हीच तुमची शिवछत्रपतींच्या प्रति आदरभावना ?

ती अग्रिमा जोशुआ ती तर इतकी हुशार आहे ... तीला शिवछत्रपतींच्यावर जोक करण्याआधी अक्कल नव्हती पण उभ्या महाराष्ट्रातून तीचा निषेध केला गेल्यावर मात्र तीला यावर राजकारण कसं करायच हे बरोबर ठाऊक म्हणून तीने यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना ओढण्याचा प्रयत्न केला. कारण तीला माहिती आहे महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या प्रेमापेक्षा काहींना राजकारण जास्त जवळचं आणि महत्वाचं वाटतं !

त्या अग्रिमाला राजकारणी नेत्यांवर बोलण्याचा जोक करण्यावर कोणालाही आक्षेप असण्याचे कारणच नव्हतं. तीच्या पुर्ण Video अर्ध्यापेक्षा जास्त तीने पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टिका केलीय. तीचा तो पुर्ण Video या आधी बाहेर आला असता तर आज जो विरोध तीला महाराष्ट्रभरातून होतोय तो कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला नसता. कारण त्याला राजकीय वळण लागलं असतं आणि शिवछत्रपतींच्यावरील जोकलाही तितकसं महत्त्व उरलं नसतं. पण 'साप भी मरे और लाठी भी न तुटे' या हुशार खेळीने त्या अग्रिमाचा फक्त शिवछत्रपतींच्यावरील जोकचाच भाग पसरवण्यात आला ...... आपल्या आराध्यदैवतांबद्दल अशाप्रकारे जोक कोणीही मराठी माणूस सहन करणार नाही हे ठाऊक असल्याने जीला एक पक्ष म्हणून विरोध करता येत नाही तीला शिवभक्तांच्या खांद्यावर बंदुक ठेवून तीला धडा शिकवला गेला .... आता तीला आणि तिच्यासारख्या अनेक मुर्ख स्टॅंडअप कॉमेडियन त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल कायदेशीर  कारवाई होइल की त्यावरही राजकीय नाट्य घडेल हे पहावे लागेल कारण ......

शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचे हेच दुर्दैव आहे की आपल्या आराध्यदैवतांबद्दल कोणी काहीही बोललेल चालतं पण त्यावर काहीजण आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सदैव तत्पर असतात....  गलिच्छ राजकारणापायी फालतु भिकार स्टॅंडअप कॉमेडियनवर कायदेशीर कारवाई होणार की नाही याबद्दल संशय आहे पण यांच्यामुळे भविष्यात अकारण राष्ट्रपुरूषांची बदनामी होत राहिल की काय अशी भिती आहे !

©दिव्यदृष्टी Blogspot 2020

टिप्पण्या

  1. शिवसेना या राजकीय पक्षाला लोक पुढच्या निवडणुकीत उत्तर देतील.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

शिवछत्रपतींच्या सुवर्ण सिंहासनाची आज गरज काय ?