गडावर भेटणारा तो अनोळखी गडी

आपल्याला कुठे जायचे आहे. कुठल्या मार्गाने जायचे आहे. यांचे आणि आपले नाते नक्की कधी जुळले ? काय आहे हे नातं ? कोण आहेत की निष्ठावंत साथ देणारी आणि तुमच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणारी ? गडाचा सगळा घेरा, त्यांच्या वाटा सर्व काही यांना आधीच ठाऊक असल्यासारखं, गडावरील प्रत्येक ठिकाण यांना ठाऊक असते. कोण असतात ही..... गडावर भेटणारा तो अनोळखी गडी -------------------------------------- - बळवंतराव दळवी ओळख नाही पाळख नाही न त्याला आपण स्वतःहून गडकिल्ल्यावर जातानाचा संदेश दिला असतो. पण जणू आपण गडावर येणार हे त्याला आधीच कोणी सांगितलेलं ! कधी तो फार पुढे तर कधी वाट बघत दुरुन आपल्याकडे लक्ष ठेवू असतो. आपण थोडा विसावा घेतो. तो लगेच आपल्या जवळ येतो. आपल्याकडे पाहतो. जणू म्हणत असतो, "चाला बिगीन बिगीन लैय चढ हाय अजून." तो पुढे असल्याने आपल्याल...