जयपूर येथील प्रसिध्द जंतर मंतर आणि महाराष्ट्र संबंध

Jaipur डायरी - बळवंतराव दळवी मध्यंतरीच्या काळात माझं जयपूरला जाणं झालं. तिथले आमेर पॅलेस, जयगड फोर्ट, हवामहल, जलमहल, म्युझियम अशी अनेक ठिकाणं पाहिली, पण यापैकी अनेक ठिकाणं ही फक्त खास राण्यांसाठी बांधली होती हे समजल्यावर मला जयपूर मधील एकच ठिकाण आवडलं.... 'जंतर मंतर' खर तर इथे कोणतेही मंत्र वैगेरे नाही तर इथे अनेक यंत्र आहेत. याला यंत्र वेधशाळा या शब्द योग्य. पण उत्तर भारतात 'य' चा उल्लेख 'ज' केला जातो जसे आपल्याकडे जाधव पण तिथे यादव. तसेच यंत्रच्या जागी जंत्र त्याचाच पुढे जंतर झालं ! पहिल्यांदा गेलो तेव्हा इथले अनेक यंत्र पाहिले... हे यंत्र वेळ, काळ, राशी, नाडी अशावर सूर्याचा होणारा प्रभाव दर्शविणारी आहेत. हे यंत्र समजून घेण्याचा प्रयत्न केला काही यंत्र नाही समजले. ठरवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला गेलो. यावेळी अभ्यासून ते यंत्र पाहिले. व्हिडिओ काढले ते लवकरच माझ्या YouTube चॅनल वर टाकणार आहेच. जयपूर मधील गाईड त्यांच्या राजाबद्दल खूप भरभरून बोलले... पण आम्हाला जयपूर फिरवणाऱ्या ड्राइव्हरने सांगितलं ते ऐकून आपल्या महाराष्ट्रातील गडक...