जयपूर येथील प्रसिध्द जंतर मंतर आणि महाराष्ट्र संबंध
Jaipur डायरी - बळवंतराव दळवी
मध्यंतरीच्या काळात माझं जयपूरला जाणं झालं. तिथले आमेर पॅलेस, जयगड फोर्ट, हवामहल, जलमहल, म्युझियम अशी अनेक ठिकाणं पाहिली, पण यापैकी अनेक ठिकाणं ही फक्त खास राण्यांसाठी बांधली होती हे समजल्यावर मला जयपूर मधील एकच ठिकाण आवडलं....
'जंतर मंतर' खर तर इथे कोणतेही मंत्र वैगेरे नाही तर इथे अनेक यंत्र आहेत. याला यंत्र वेधशाळा या शब्द योग्य. पण उत्तर भारतात 'य' चा उल्लेख 'ज' केला जातो जसे आपल्याकडे जाधव पण तिथे यादव. तसेच यंत्रच्या जागी जंत्र त्याचाच पुढे जंतर झालं !
पहिल्यांदा गेलो तेव्हा इथले अनेक यंत्र पाहिले... हे यंत्र वेळ, काळ, राशी, नाडी अशावर सूर्याचा होणारा प्रभाव दर्शविणारी आहेत. हे यंत्र समजून घेण्याचा प्रयत्न केला काही यंत्र नाही समजले. ठरवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला गेलो. यावेळी अभ्यासून ते यंत्र पाहिले. व्हिडिओ काढले ते लवकरच माझ्या YouTube चॅनल वर टाकणार आहेच.
जयपूर मधील गाईड त्यांच्या राजाबद्दल खूप भरभरून बोलले... पण आम्हाला जयपूर फिरवणाऱ्या ड्राइव्हरने सांगितलं ते ऐकून आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले का भग्न अवस्थेत आहेत याचे पुन्हा एकदा स्मरण झाले.... "साहब पहले मुगल फिर बादमे अंग्रेजो के सामने सरंडर होके अपने राज्य को बचाये रखा."
आजही तिथल्या City Palace मध्ये तिथले महाराजा राहतात. त्यांच्या पूर्वजांनी उभ्या केलेल्या अनेक वास्तू पैकी मला आवडलेली एकमेव वास्तू म्हणजे जंतर मंतर !
जंतर मंतर मधून बाहेर पडणाऱ्या दरवाजाजवळ असणाऱ्या शिलाफलकाचे नेहमीच्या सवयीप्रमाणे वाचन करता या वास्तू उभारणीशी महाराष्ट्रातील ( मराठा ब्राह्मण असा मूळ उल्लेख ) ज्योतिष पंडित जगन्नाथ यांचाही हातभार आहे हे वाचून छाती अभिमानाने फुलली. अशीच वास्तू पुढे दिल्लीला सुुुुध्दा उभारली गेली त्यातही कदाचित महाराष्ट्राचे पंडीत जगन्नाथ यांनी हातभार लावला असावा ( मी दिल्लीचे जंतर मंतर पाहिले नाहीय ) तुम्ही जयपूरला गेल्यावर जंतर मंतर ही वास्तू नक्की पहा आणि महाराष्ट्राशी, मराठी माणसांला अभिमान वाटेल अशी ही माहिती देशातील तमाम मराठी माणसांपर्यंत पोहचवा !
© बळवंतराव दळवी.
जून २०२३
#jaipur #जयपूर #बळवंतराव_दळवी #जंतरमंतर #महाराष्ट्र #राजस्थान #गडकिल्ले #राजवाडे #इंग्रज #मोगल #इतिहास #शिलालेख
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा