हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??
हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ?? शिवकालातील तुळजाभवानी आणि एकवीरा आईचा उल्लेख शिवछ्त्रपतींच्या आज्ञेवरून लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथातील ही काही उदाहरणे ... पौराणिकानां प्रवरं भट्टगोविन्दनंन्दनम | एकवीराप्रसादेन लब्धवाकसिध्दिवैभवम || अध्याय १ श्लोक क्र. ६ अर्थ - पौराणिकांचा मुकुटमणी, एकवीरा देवीच्या कृपेने वाक्सिसिध्दिवैभव प्राप्त झालेला. य: शास्ति वसुधामेतां राजा राजगिरीश्वर : | तुलजाया: प्रसादेन लब्धराज्यो महातपा: || - अध्याय १ श्लोक क्र. ११ अर्थ - जो राजगडाचा अधिपती राजा ह्या पृथ्वीवर राज्य करित आहे, तुळजाभवानीच्या प्रसादानें ( आशीर्वादाने ) ज्याला राज्यप्राप्ती झाली आहे, जो महातपस्वी आहे. देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तक: | प्रपन्नानां परित्राता प्रजानां प्रियकारक : || - अध्याय १ श्लोक क्र. १५ अर्थ :- देव ब्र...