पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक युगाचे मनु आहेत !

इमेज
मनुस्मृती जाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष समोर असताना त्यांना आधुनिक युगातील मनु असे कोणी संबोधले असेल काय ? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो... २५ डिसेंबर १९२७ साली महाड येथे चवदार तळ्याच्या आंदोलन वेळी हिंदू समाजातील सामाजिक विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृतीचे दहन करताना वेदीवर मनुस्मृतीचा ग्रंथ ठेवून बापूसाहेब सहस्त्रबुध्दे या ब्राह्मण  सहकारी व इतर चार पाच अस्पृश्य साधू महंत यांच्या हस्ते मनुस्मृतीचे सामूहिक दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते हे सर्वश्रुत आहे. पुढे स्वतंत्र होणाऱ्या हिंदुस्थानचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार व्हावा म्हणून प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समिती तयार केली. १० डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी निवड करण्यात आली.  २१ ऑगस्ट १९४७ रोजी घटना समिती अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा संबधीत कायदेशीर गोष्टीचा विचार करण्यासाठी एक समिती ( मसुदा समिती / Drafting Committee ) नेमली त्या समितीचे सभासद डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अ...