डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक युगाचे मनु आहेत !

मनुस्मृती जाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष समोर असताना त्यांना आधुनिक युगातील मनु असे कोणी संबोधले असेल काय ? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो...

२५ डिसेंबर १९२७ साली महाड येथे चवदार तळ्याच्या आंदोलन वेळी हिंदू समाजातील सामाजिक विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृतीचे दहन करताना वेदीवर मनुस्मृतीचा ग्रंथ ठेवून बापूसाहेब सहस्त्रबुध्दे या ब्राह्मण  सहकारी व इतर चार पाच अस्पृश्य साधू महंत यांच्या हस्ते मनुस्मृतीचे सामूहिक दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते हे सर्वश्रुत आहे.

पुढे स्वतंत्र होणाऱ्या हिंदुस्थानचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार व्हावा म्हणून प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समिती तयार केली. १० डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी निवड करण्यात आली.  २१ ऑगस्ट १९४७ रोजी घटना समिती अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा संबधीत कायदेशीर गोष्टीचा विचार करण्यासाठी एक समिती ( मसुदा समिती / Drafting Committee ) नेमली त्या समितीचे सभासद डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम. याच मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्त करण्यात आले. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे उत्तम कार्य केले त्यात त्यांना अनेकांनी सहकार्य केले. १७ नोव्हेंबर १९४९ च्या बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल अनेक सभासदांनी प्रशंसा केली...


यातीलच एक सभासद सेठ गोविंददास ( Seth Govind Das ) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कौतुक करताना,

"I am very happy today on seeing that third reading of the Constitution, completed by us in about three years, has now begun. On this occasion, I would at first like to congratulate Dr. Ambedkar who laboured hard to put the Constitution as settled by the Assembly be passed. It has been said about Dr. Ambedkar that he is the Manu of present age. Whatever be the truth of that statement, I can say that Dr. Ambedkar was quite equal to the task of Constitution making that had entrusted to him."


"It has been said about Dr Ambedkar that he is the Manu of present age..."

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक युगाचे मनु आहेत !"
                   - सेठ गोविंददास 
               ( १७ नोव्हेंबर १९४९ )

असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर त्यांची दास यांनी आधुनिक युगाचे मनु म्हणत प्रशंसा केली. घटना समितीच्या सभासदांनी आपआपल्या भाषणातून डॉ. आंबेडकरांची मसुदारुप घटना निर्मितीच्या अद्वितीय कर्तृत्वाचा गौरव करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अद्भुत बुध्दीमत्तेची, कायदा व घटना संबधीत विशाल सखोल ज्ञानाचे, जागरूक देशभक्तीचे राष्ट्रप्रेमाचे मनापासून कौतुक केले आणि त्यांना भारतीय घटनेचे महान शिल्पकार म्हणून मान्य केले. 

एकाबाजूला सामाजिक विषमता दूर करण्यासाठी मनुस्मृतीचे दहन करणारे बाबासाहेब आंबेडकर तर दुसरीकडे त्यांना ते समोर असताना आधुनिक युगाचे मनु संबोधणे या दोन्ही बाजू समोर येणे गरजेच्या आहेत त्यामुळे ही महत्त्वाची आणि अप्रसिध्द माहिती सर्व भारतीयांसाठी नव्याने इथे मांडत आहोत ! 


संदर्भ :-
महामानव डॉ. भी. रा. आंबेडकर - डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड - चांगदेव भवानराव खैरमोडे 
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर - धनंजय कीर

        २५ डिसेंबर २०२३ 
©दिव्यदृष्टी Blogspot 2023

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??