नाण्याच्या दोन बाजू
पाहण्यासारख्या - नाण्याच्या दोन बाजू
एका बाजूला अफाट पैसा आणि घृणा
तर दुसऱ्या बाजूला अपार निष्ठा आणि श्रद्धा
मुंबईसह महाराष्ट्रभरात एक विषय गेले काही महिने वादग्रस्त बनून राहिला आहे. तो म्हणजे १ जानेवारी रोजी कोरेगाव - भीमा येथे घडलेली नियोजनपुर्ण दंगल आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी !
कोरेगाव - भीमात दंगल घडली आणि त्याचे पडसाद ३ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्रात उमटले. या दंगलीला जबाबदार म्हणून काही नावे समोर आली ते म्हणजे सांगलीचे संभाजीराव भिडे गुरुजी आणि पुण्याचे मिलिंद एकबोटे यांचे.
भिडे गुरुजी हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची संघटना चालवणारे भिडे गुरुजी उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि छत्रपती श्रीसंभाजी महाराज या दोन महाराष्ट्राच्या आराध्यदैवतांभोवती कार्य करणारी संघटना म्हणून ओळख !
कोरेगाव भीमा दंगलीत संभाजीराव भिडे गुरुजींचे नाव यात येताच त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभरात रान उठवल गेलं. काहींनी सांगितले की, "मी भिडे गुरुजींना दगड मारताना पाहिल." काहींनी म्हटल की "दंगलीला संभाजी भिडे गुरुजी जबाबदार आहेत" !
भिडे गुरुजींना मानणारा वर्ग मात्र हे सारं मुकपणे पाहात होता. कारण त्यांना त्यांच्या गुरुजींकडून काहीच आदेश आला नव्हता. फेसबुक whtsp वर धारकऱ्यांच्या गुरुजींची निंदानालस्ती होताना उघड्या डोळ्यांनी गुरुजींचे धारकरी पाहत होते. त्यांना गुरुजींचा आदेश होता, " हे सारं राजकारण आहे आपण त्यात अडकायला नको ! कुठल्याही प्रतिक्रिया टाळा !"
गुरुजींच्या धारकऱ्यांनी गुरुजींचा आदेश पाळला. धारकऱ्यांसमोर त्यांच्या आदर्शांवर आरोप, टिका केली जात होती. काही महाभाग भिडे गुरुजींच्या फोटोला edit करून विकृत मनाने फोटो तयार करून ते पसरवत होते. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेउन भिडे गुरुजींवर आरोपावर आरोप करत होते पण आदरणीय भिडे गुरुजी आणि त्यांचे धारकरी सयंम पाळून शांत होते. भिडे गुरुजींचा सत्य परिस्थितीवर पुर्ण विश्वास होता आणि गुरुजींच्या धारकऱ्यांचा महाराष्ट्र सरकारवर विश्वास होता.
सत्य परेशान हो सकता है |
लेकिन पराजित नही हो सकता है ||
एकीकडे संभाजीराव भिडे गुरुजींवर अत्यंत खालच्या थरातील आरोप आणि अत्यंत बिभस्तपणे तयार केलेल फोटो पसरवले जात होते. पण दुसरीकडे मात्र .... दुसरीकडे मात्र एकाही धारकऱ्याने प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध कुठलाही फोटो edit न करता किंवा कुठल्याही प्रकारची गलिच्छ भाषा न वापरता फक्त सत्याची बाजू लावून धरली होती.२८ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ आणि समर्थनार्थ सन्मान मोर्चा काढण्यात आले. कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. कुठेही न दगडफेक झाली न कुठे जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पोलिसांना कुठलाही त्रास न देता हजारोंच्या संख्येंने महाराष्ट्रभरात 'भिडे गुरुजी सन्मान मोर्चा' काढण्यात आले. मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चा वेळी महिला पोलिसांनी आणि वरिष्ठ पोलिसांनी भिडे गुरुजींच्या मोर्चाची शिस्त पाहून धारकऱ्यांचे कौतुक केले आणि मोर्चा शिस्तबद्ध काढला म्हणून आभारही मानले.
.... आणि शेवटी सत्य बाहेर आलेच.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भिडे गुरुजींना क्लिनचीट देत गुरुजींचा या दंगलीशी कुठलाही संबंध नाही हे स्पष्ट केले. सत्य बाहेर आल्यानंतरही ज्यांनी भिडे गुरुजींवर अत्यंत खोटे आरोप केले होते आणि ज्यांनी अकारण गुरुजींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या विरोधात भिडे गुरुजींचे धारकरी सयंम राखून कुठलीही चुकीची प्रतिक्रिया देताना दिसले नाही.
दोन वेगवेगळ्या भूमिका ... दोन वेगवेगळे विचार .... कुठली बाजू योग्य आणि कुठली बाजू चुकीची ....
एका बाजूला अफाट पैसा आणि घृणा
तर दुसऱ्या बाजूला अपार निष्ठा आणि श्रद्धा
नाण्याच्या दोन बाजू तुमच्या समोर आहेत !
- सत्याची कास धरणारा
एक सामान्य माणूस
सुर्यात अंधार नाही आपल्यात पाप नाही 🙏🚩
उत्तर द्याहटवा