सुवर्ण सिंहासन हे शिवभक्तांचे स्वप्न आहे ! - डॉ. अमोल कोल्हे

सुवर्ण सिंहासन हे शिवभक्तांचे स्वप्न आहे !
        
                              - डॉ. अमोल कोल्हे 

मुंबईतील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आदित्यराव गायकवाड हे त्यांच्या कामानिमित्त लालबाग येथे गेले असताना.  लालबाग येथील प्रसिद्ध भारतमाता सिनेमा येथे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या गाजलेल्या मालिकेतील कलाकार संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांची अनपेक्षित भेट झाली. अमोल कोल्हे यांना महाराष्ट्राने गेले अनेक वर्षे मालिका मधून पाहिलेले आहे. कधी शिवछत्रपती तर कधी संभाजी महाराजांची त्यांची भूमिका अजरामर झालेली आहे.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणजेच आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी रायगडावर २०१७ च्या जून मध्ये रायगडावर लाखोंच्या संख्येने शिवभक्तांना  एकत्र करुन सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापित करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी भिडे गुरुजी आणि त्यांचे धारकरी महाराष्ट्रभर फिरून लोकवर्गणीतून सुवर्ण सिंहासन उभं करणार आहेत. आणि त्या सिंहासनाच्या सुरक्षेसाठी ३६५ दिवस दररोज एक तालुका याप्रमाणें रायगडावर सशस्त्र २००० तरुण शिवभक्तांचा खडा पहारा ठेवला जाणार आहे. ही माहिती आदित्य गायकवाड यांनी डॉं अमोल कोल्हे यांना दिली.  "रायगडावर स्थापन होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनात आपल्या सारख्या कलाकारांचेही योगदान असलं पाहिजे" असे म्हणून आवाहन केलं!

त्यावर डॉ. अमोल कोल्हे म्हणाले -
"सुवर्ण सिंहासन हे शिवभक्तांच स्वप्न आहे आणि त्यात माझं योगदान असणार आहेच, पुढील महिन्यातच मी या विषयावर आदरणीय गुरुजींना भेटणार आहे आणि माझं योगदान देणार आहे"

सामान्य शिवभक्तांपासून मोठमोठ्या व्यक्तींनी या सुवर्ण सिंहासनाच्या पुर्नसंस्थापनेसाठी आपले धर्मकर्तव्य पार पाडण्याचे ठरवले आहे असे दिसून येत आहे.

रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापन होइल असा तो सुवर्ण दिवस लवकर येवो अशी समस्त महाराष्ट्रभरातील शिवभक्तांची इच्छा आहे असे आदित्य गायकवाड आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??