स्वच्छ मुंबई पुरस्कार आणि पोट दुखी

या मुंबईने करोडोंची कुटुंबे पोसली, करोडोंच्या पोटाला अन्न दिलं, मर्यादा नसतानाही ती आजही लोंढ्यांना सामावून घेत आहे ....

स्वच्छ मुंबई पुरस्कार आणि पोट दुखी

संपूर्ण देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मुंबईची निवड झाली. मुंबई महानगरपालिकेला हा मोठा दिलासा होता. मुंबईकरांना हे अभिमानास्पद होत.

पण ......

इतक्यात काही News चैनल मुंबई अस्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी आपले कैमेरे घेउन विभागाविभागात फिरू लागले. जिथ कचरा आहे तिथ जाऊन स्थानिकांना त्या कचऱ्याबद्दल विचारु लागली. स्थानिक सुद्धा "हा कचरा किती दिवस इथेच आहे, बघा हा किती कचरा" असं म्हणत त्या चैनलवर बोंबलू लागले.

त्यांना पाहून मनात विचार आला की, तो कचरा आला कुठून ? कोणी टाकला ? आकाशातुन पडला की पाकिस्तानाने इथे येउन टाकलाय ? ?

तो कचरा त्या स्थानिकांपैकीच कोणीतरी टाकला असेल ना ? मग तो कचरा ज्यांनीच पसरवला त्यांना सरकार किंवा महानगरपालिकेवर बोट दाखवण्याचा हक्क आहे  काय ?

'मुंबई शहर कचरा मुक्त आहे' म्हणून स्वच्छ मुंबईचे नाव आले नसून देशातील इतर शहराच्या मानाने मुंबई शहर स्वच्छ आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेला पुरस्कार मिळाला आहे हे साधं गणित लोकांना का कळत नाहीय ?

मुंबई पूर्णपणे स्वच्छ रहायला हवी याबाबत कुठलेही दुमत नाही. पण मुंबईला पुरस्कार मिळताच मुंबईची जमेल तशी बदनामी करणारे लगेच पुढे आलेले दिसत आहेत.

मुंबई... माझी मुंबई... आपली मुंबई ! या मुंबईने करोडोंची कुटुंब पोसली, करोडों लोकांना पोटाला अन्न दिले. कऱोडों लोकांना निवारा दिला. मर्यादा नसतानाही ती आजही लोकांना सामावून घेत आहे. अनधिकृत झोपडपट्टी वाढतेय,, लोंढेच्या लोंढे दररोज इथ येत आहेत तरीही मुंबई दररोज सक्रियच !

देशातील इतर शहर आणि मुंबई यात जो अंतर आहे तो एकदा पाहिला तर मुंबईतील अस्वच्छता आणि तिला मिळालेला स्वच्छ शहर पुरस्कार का दिला गेला असेल याचा विचार व्हावा मग मुंबईवर टिका करा !

आम्ही मुंबईकर मान्य करतो मुंबई पुर्ण कचरा मुक्त होणार नाही याला कारणे अनेक आहेत हे तुम्हीही ओळखत असाल. म्हणून तुर्तास एवढेच सांगतो, मुंबई जशी आहे तशी ती देशातील इतर शहरापेक्षा उजवी आहे आणि कचरा मुक्त शहर नाहीतर इतर शहरापेक्षा स्वच्छ शहर म्हणूनच मुंबईला पुरस्कार मिळाला आहे..... आता तरी तुमची पोट दुखी थांबवा !!!

                     - एक मुंबईकर

टिप्पण्या

  1. तुम्ही केलेली सादर माहिती खोटी आहे ।
    देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून अनुक्रमे
    1 इंदोर
    2 भोपाल
    3 विशाखापत्तनम
    असून मुंबई पहिल्या 25 मध्ये पण नाही

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??