...... आणि शिवभक्त धावून आले !

महिलेच्या फोटोवर आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुकवर व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात FIR दाखल  



प्रतिनिधी - मुंबईत मालाड येथे राहणाऱ्या एका विवाहीत महिलेचे फोटो Edit करून तिला बदनाम करण्याच्या उद्देशाने फेसबुकवरील गृपवर एका विक्षिप्त तरुणाने ते फोटो फेसबुकवर व्हायरल केल्याची घटना घडली.

उपलब्ध माहितीनुसार 'तेरा दिवाना' असे नाव धारण करणाऱ्या त्या विक्षिप्त तरुणाने अनामिका ( नाव बदललेले आहे ) या महिलेने साईबाबांचा फोटो फेसबुकवरील एका गृपवर टाकला होता. त्यावर अनेकांनी कमेंट करताना 'ॐ साई राम , जय साई राम' असे लिहिलेले असताना त्या विक्षिप्त तरुणाने सदर महिलेशी अश्लील भाषेत बोलणे सुरु केले. त्यावर त्या महिलेने त्या तरुणाला त्याबाबत जाब विचारला असता त्या तरुणांने त्या महिलेला मेसेज करून अश्लील संभाषण सुरु केले आणि तीचे फेसबुकवरील फोटो डाउनलोड करून त्यावर अश्लील लिखाण करून ते पसरवण्याची धमकी देउन त्याने ते फोटो फेसबुकवरील गृपवर प्रसिद्ध केले.

त्या महिलेने ही गोष्ट सांगलीतील श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना सांगितली. ती महिला मुंबई येथे राहात असल्याने शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी ही गोष्ट ताबडतोब मुंबईतील धारकऱ्यांच्या कानावर घालून सदर महिलेला सहकार्य करण्यास सांगितले. मुंबईतील धारकरी दत्ता पार्टे आणि अविनाश पागडे यांनी त्या महिलेसोबत मालाड मालवणी पोलीसात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी फेसबुकवरील त्या विक्षिप्त तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून सायबर सेल पोलीस अधिक तपास करत आहेत.

सोशल मिडियावर असे अनेक विक्षिप्त लोक आजही आहेत अशावेळी प्रत्येक स्त्रीने काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सोशल मीडियावर कुणाशी मैत्री करतो अथवा बोलतो याकडे जाणिवपूर्वक लक्ष द्यावे !

श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय प. पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनीही मागीलवर्षी सांगलीत अशाच एका घटनेत एका मुलीशी गैरवर्तन केलेल्या दोषी इसमासं पाठीशी घातले म्हणून चाटे कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना कान धरून उठाबशा काढण्याची शिक्षा केली होती. आदरणीय भिडे गुरुजींचे धारकरी त्यांच्याच गुरुवर्यांच्या मार्गावर चालत नेहमीच शिवकार्यासोबच सामाजिक कार्य करत असलेले दिसून येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??