भिडे गुरुजींनी तरुणांना हेच शिकवले काय ?
एक भाऊ आपल्या अर्धवट बेशुद्ध बहिणीला कसाबसा सावरत रायगड किल्ला उतरत होता आणि .....
भिडे गुरुजी तरुणांना चुकीच्या मार्गावर नेतात असा आरोप काही विशिष्ट लोकांकडून नेहमी होत असतो. अशा वेळी सत्य काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न फारच कमी लोक करत असतात.
यंदाच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच तिथी नुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावर पावसाने दोन दिवस जोरदार हजेरी लावली होती. मात्र सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे गडावर येणाऱ्या शिवभक्तांची संख्या कमी झाली नव्हती. अगदी ५ वर्षाच्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध शिवभक्तांनी रायगडावर आपल्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकास हजेरी लावली होती.
राज्याभिषेक झाल्यावर शिवभक्त रायगड उतरत असताना कोणा अज्ञात इसमाने बातमी पसरवली की 'रायगडावरील धबधब्यामुळे वाट वाहून गेली आहे' या चुकीच्या बातमीमुळे पोलिसांनी रायगडाचा महादरवाजामधील मुख्य प्रवेशद्वार बंद केले. रायगड उतरत असणाऱ्या लोकांची महादरवाजा येथे गर्दी होऊ लागली. ६ जूनला चुकीच्या नियोजनामुळे झालेली चेंगराचेंगरी पोलिसांनी लक्षात घेउन दरवाजा बंद करण्याचे उचललेले पाऊल आणखी गोंधळ निर्माण करु लागले होते.
उपस्थित प्रत्येक शिवभक्तांनी सयंम पाळून ४ तास शांतता राखली. या लोकांमध्ये आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांचे धारकरी मोठ्या संख्येंने होते. त्यांनी काठ्या धरून टपटप्प्याने लोकांना खाली जाण्यास मार्ग करून दिला.
महादरवाज्याच्या खाली नक्की काय घडल आहे याची योग्य माहिती कोणाकडेच नव्हती. शेवटी शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी खाली जाण्याचा निर्णय घेतला. सोबत जाडजूड रशी घेउन मुंबईचे प्रभाकर शिंदे, महाडचे धारकरी सिध्देश मोरे, पराग बाठे, दुर्गवीर प्रतिष्ठानचे अजित राणे आणि काही शिवभक्त खाली उतरून जिथ धबधब्याचा जोर वाढला होता तिथ रशी बांधून काही धारकरी स्वतः त्या पाण्यात उभे राहून एक एक करत लोकांना खाली सोडायला मार्ग करून देऊ लागल्यावर शेवटी वर ४ तास थांबलेल्या गर्दीचा राग कमी झाला आणि रात्री ७ वाजता गडावरील गर्दी पूर्णपणे कमी झाली.
मुंबईचे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मंगेशदादा केनी आणि दिपक खामकर हे सगळ्यात शेवटी त्या धबधब्यात थांबणारे धारकरी पोलिसांनी 'आता गड रिकामा झाला आहे वर आता कोणी नाही' असे सांगितल्यावर खाली उतरायला जाणार इतक्यात दोन व्यक्ती त्यांना गडावरुन उतरताना दिसले. एक भाऊ आपल्या अर्धवट बेशुद्ध बहिणीला कसाबसा सावरत रायगड किल्ला उतरत होता. धारकऱ्यांनी विचारपूस केल्यावर कळले की पाऊस आणि थंडी सहन न झाल्याने मुलीला सारखी चक्कर येउन ती बेशुद्ध पडत होती. त्या मुलीच्या भावाला धीर देत धारकऱ्यांनी त्या मुलीला खांद्यावर घेउन रायगड उतरण्याचे ठरवले.
मध्येच कुठे थांबून त्या मुलीच्या हाताला पायाला मालिश करत तीला जागे ठेवण्याचा प्रयत्न करत होती. मध्येच त्या मुलीची दातखिळी बसली. त्यावर तिला कांदा नाकाशी धरून कसबसं शुध्दीत ठेवून धारकऱ्यांनी खाली आणलं. पोलिसांना विनंती केल्यानंतर त्यांच्या गाडीतून महाड येथे उपचारांसाठी पाठवले.
मंगेश केनीशी या सर्व घटनांबद्दल विचारले असता त्यांनी अत्यंत ह्रदयस्पर्शुन जाणारे सत्य कथन केले,
" सर्व गड रिकामा झाला होता.... सर्वात शेवटी आम्ही होतो. कसं काय आम्हाला ते दृश्य दिसलं आणि आम्ही क्षणाचाही विचार न करता त्या ताईला मदत करायची ठरवल. आम्ही जर लगेच माघारी फिरलो असतो तर त्या दोघांना मदत मिळणे अशक्य होतं.... त्या भावाने काय केले असते ? आमच्या मागून उतरणारे कोणीच नव्हते ... आज आम्ही जे त्या ताईंसाठी केले ते आमच्या आदरणीय भिडे गुरुजींच्या शिकवणीमुळेच. काही विशिष्ट लोक म्हणतात की भिडे गुरुजी तरुणांना चुकीच्या मार्गावर नेतात .... हा आम्ही स्विकारलेला मार्ग जर चुकीचा असेल तर तो आम्ही सतत स्विकारु आणि आमच्या मायभगिनींना सतत सहकार्य करत राहू मग कोणी कितीही आम्हाला विरोध केला तरी आम्हाला हाच शिवछत्रपतींच्या आणि संभाजी महाराजांच्या मनात उतरणारा मार्ग कधीही मान्य असेल !"
धारकऱ्यांनी केलेल्या या कार्याबद्दल रायगडावरील पोलिसांनी या धारकऱ्यांचे आभार मानलेच तसेच महाराष्ट्रभरात या सर्व घटनांवर भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक होत आहे !
संभाजीराव भिडे गुरुजींनी त्यांच्या तरुण धारकऱ्यांना दिलेली शिकवण रायगडावरील हजारों शिवभक्तांनी पाहिली आणि अनुभवलीही. कोणी कितीही म्हणू दे की भिडे गुरुजी तरुणांची माथी भडकवतात पण जर माथी भडकवणे म्हणजे स्वतः थकलेले असतानाही समाजाला उपयोगाची कामे करणे असेल तर अशी माथी भडकावणे कधीही योग्यच असेल !!!
हे फक्त धारकरिच करू शकतात
उत्तर द्याहटवाहेच गुरुजी चे संस्कार आहेत.हीच तर शिकवण आहे .
उत्तर द्याहटवागुरुवर्य गुरुजी धारकर्याना कधीच चुकीचा मार्ग सांगनार नाहि .
उत्तर द्याहटवागुरुवर्य गुरुजि
शिवशंभु रक्तगटच हे करु शकतो.
उत्तर द्याहटवाकौतूकास्पद
उत्तर द्याहटवाShivbhaktach ya jagala tarnar ..
उत्तर द्याहटवापुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय...!
उत्तर द्याहटवा🙏
उत्तर द्याहटवागुरूवर्य
उत्तर द्याहटवाछत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.!
उत्तर द्याहटवारयतेवर स्वत:च्या कुटूंबापेक्षाही जास्त प्रेम करणारा राजा.
हे माझे कर्तव्यच....
उत्तर द्याहटवाआम्ही तीन दिवस रायगडावर होतो धो धो पडणारा पाऊस अन तो वारा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही कार्यक्रम आटोपून आम्ही गड उतरायला सुरुवात केली काही वेळातच आम्हाला खालून वर येणारे शिवभक्त भेटले ते म्हणाले खाली खूप गर्दी झाली आहे जाऊन काही उपयोग नाही तरीपण आम्ही मुंबईकरांनी खाली जाण्याचा निर्णय घेतला काही वेळातच ती अफाट गर्दी आम्हाला दिसू लागली काय करावे कळत नव्हतं काही वेळ आम्ही ही त्या गर्दीत जाऊन बसलो थोड्या वेळात ठाण्याचे काही शिवभक्त (धारकरी) तिथं आले ते म्हणाले खाली धबधब्यामुळं रस्ता वाहून गेला आहे मी त्यांच्यासोबत खाली जाण्याचा प्रयत्न करू लागलो एक आडमार्गाने खाली उतरलो अन पुन्हा ती गर्दी आता गर्दीतून खाली जायचं होतं पण ते काही सोपं काम नव्हतं सर्व जण बराच वेळ झाल्यामुळं वैतागले होते आम्ही पुढं सरकताच काही जणांनी आम्हाला अडवलं त्यांना समजावून पुढं गेलो पुन्हा काही जणांनी अडवलं त्यांना न समजवताच आम्ही पुढं गेलो बऱ्याच जणांच्या शिव्या खात आम्ही खाली जाऊ लागलो तर काही जणांनी आमच्या छातीवरील सुवर्ण सिंहासनाचा बिल्ला पाहून आदराने वाट मोकळी केली त्याठिकाणी पोहचल्यावर पाहतोय तर काय एका बाजूला दोर बांधून त्या दोरीच्या साहाय्याने लोक खाली उतरत होती जर असेच एक मार्गी लोक उतरत राहिले तर रात्र नक्की होईल हे लक्षात आलं मी अन तेथील एक पोलीस कर्मचारी दोघांनी मिळून अजून एक मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला मोठ मोठे दगड उचलून त्या वाहत्या पाण्यात रचू लागलो पण पाण्याचा प्रवाह खूप असल्याने दगड पण वाहू लागले त्याही परिस्थितीत आम्ही तो मार्ग पूर्ण केलाच अन मंग दोन लाईन करून शिवभक्त गड उतरू लागले तेव्हा कुठं गर्दी कमी होऊ लागली तरी पण आम्हाला संध्याकाळ झाली गड रिकामा होत आला तेव्हा मी मंगेश केणी यांना खाली उतरुया अस म्हणालो पण मंगेशराव म्हणाले सर्वांना आधी खाली उतरुदे पुन्हा त्या पाण्यात आमचे कार्य सुरूच राहिले काही वेळाने पोलीस आले अन त्यांनी गड रिकामा झाला अस सांगितलं तेव्हा जीवात जीव आला मंग सुरू झालं फोटो सेशन तेवढ्यात ही मुलगी पाहिली अन तिला खाली घेऊन येण्यास आम्ही मदत केली तीन दिवस गडावर अश्या परिस्थितीत राहून पूर्ण थकून गेलो होतो पण ह्या मुलीची परिस्थिती पाहून तिला उचलून घेऊन खाली उतरू लागलो त्या वेळी इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला कसे मावळे एखाद्या जखमी मावळ्याला नेत असतील रात्रीच्या वेळी कसा प्रवास करत असतील असे बरेच प्रश्न मनात येत होते.....
समाधान याच गोष्टीच वाटतंय की तिला आम्ही वेळेत खाली येऊन पोलिसांच्या गाडीत बसवून महाडला डॉक्टरकडे रवाना केले....
खूप छान कार्य
हटवाHi हि तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जय शिवराय
उत्तर द्याहटवा