खरचं आजची पत्रकारिता विकली जातेय ? भाग - १

खरचं पत्रकारिता विकली जातेय ??
                 भाग -  १

काल पर्यंत आम्ही सर्व कसे का असेना पण या News चैनलवाल्यांच्या बातम्यांवर काही अंशी का असेना विश्वास ठेवत होतो. पण आता मात्र यांनी हद्दच केली आहे .....

आपण दाखवत असलेली बातमी किती खरी किती खोटी याची शहानिशा न करता आजचे पत्रकार त्या बातम्या दाखवतात छापतात यावर आता ठाम विश्वास बसू लागला आहे.

मागे २०१६ ला मुंबईतील लोअरपरळ येथे ना. म. जोशी मार्ग शाळेत आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांचे जाहीर व्याख्यान होते. हे व्याख्यान किमान दिड दोन हजार लोकांच्या साक्षीने तीन तास पुर्ण सुरु होत. या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच काही महिलांनी आदरणीय भिडे गुरुजींकडे आरक्षणबद्दल मागणी केली. त्यावेळी उपस्थित मुंबई प्रमुखांनी आणि धारकऱ्यांनी त्या महिलांना, "ताई, आदरणीय गुरुजी हे न आमदार आहेत न मंत्री तुम्ही चुकीच्या ठिकाणी आरक्षणबद्दल बोलत आहात."   असं म्हणत त्यांना सन्मानाने सभागृहाबाहेर नेले. पोलिसांनी त्यांना सभागृहापासून ५०० मिटर अंतरावर उभ केले होते.

व्याख्यान ऐकण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार दोन तास बसून होते. व्याख्यानानंतर गुरुजी सर्वांना भेटले. अन व्याख्यान संपल्यावर आदरणीय गुरुजी एका धारकऱ्याच्या घरी निवांत जेवून आपल्या पुढच्या मार्गास निघाले होते.....

तर दुसरीकडे मात्र .....

दुसरीकडे काही वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर अत्यंत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. त्याचे हेडींग होते 'भिडे गुरुजींना अमुक लोकांनी खोलीत कोंडले ... अमुक लोकांनी भिडे गुरुजींना वर्गात कोंडले."

हे सर्व वाचल्यावर हसु आले ... एकतर व्याख्यान पुर्ण तीन तास सुरु होते.  दिड दोन हजार लोक एका भल्या मोठ्या हॉल मध्ये उपस्थित असताना त्याला खोली किंवा वर्ग म्हणून स्वतःच त्या पत्रकारांनी आपलं हसं करून घेतले होत. ही बातमी एकही पत्रकार उपस्थित नसताना केवळ त्यांनी ना. म. जोशी मार्ग शाळा यावरून बातमीत वर्ग .. खोली   अशी शब्द टाकले होते. तरीही दुसऱ्या दिवशी मुंबईतील धारकऱ्यांनी सत्य काय आहे हे दाखवण्यासाठी ज्यांनी चुकीची बातमी लावली होती त्या वृत्तपत्रांना संपूर्ण तीन तासाच्या व्याख्यानाची Video CD दिली आणि काही फोटोही दिले. त्यांना सर्व घटनाक्रम सांगून निवेदन दिले आणि उत्सुकता म्हणून काही प्रश्न त्या वर्तमानपत्राच्या संपादकाला विचारले .....
"तुम्हाला ही खोटी बातमी मिळाली कुठून, तुमच्या कुठल्या पत्रकाराने गुरुजींच्या व्याख्यानावेळी उपस्थिती लावली होती,  तुमच्या या बातमीचा सौर्स ( आधार ) काय ? यावर जे उत्तर त्या लोकशाहीच्या चौथ्या खंब्याच्या वारसाकडून म्हणजेच संपादकांकडून आले ते ऐकून तुम्ही हसाल ..... ते म्हणाले "आम्हाला Whats up वर ही पोस्ट आली होती "

आता सहज विचार करा हे पत्रकार कशावर विश्वास ठेवून बातम्या देतात ..... whtsp वर फिरणारी पोस्ट म्हणजे पुरावा ?????? हीच यांची पत्रकारिता .....??

त्यांना दुसरा प्रश्न विचारला, "तुमची आणि इतर सर्व वर्तमानपत्रातील बातमी एकच कशी ? एक शब्दही इथे तिथे नाही. फक्त वर्ग आणि खोली हेच दोन शब्द बदलून बातमी तीच कशी ?" 

त्यावर त्यांनी कुठलेही उत्तर न देता, " तुम्ही निवेदन आणि Video CD दिले आहे ना ? आम्ही पाहून ठरवतो"  असं उत्तर दिले.


हाच काय तो लोकशाहीचा चौथा खांब ????

अरे चौथ्या खंब्याच्या खंबाधाऱ्यांनों, तुम्ही पत्रकारिता कुठल्या तळाला नेत आहात याचा तरी विचार करा .... कुठे ते बाळशास्त्री जांबेकर ... कुठे ते आचर्य अत्रे ... कुठे ते नीलकंठ खाडिलकर...  आणि कुठे तुम्ही !
खरच आज सत्य पत्रकारिता सुरु आहे काय ????

जे पत्रकार whtsp वरील पोस्टला कुठलीही शहानिशा न करता सत्य समजत असतील त्यांना आता विचारावं लागेल .....  खरच तुमची पत्रकारिता विकली जातेय ????

                     - बळवंतराव दळवी

टिप - कुठल्या वार्तापत्रात खोटी बातमी आलेली आणि नंतर कशी सारवासरव केली याचे पुरावे आहेत


                       भाग २ लवकरच.

टिप्पण्या

  1. यांना चपराक दिली पाहिजे. खोटी बातमी दिली म्हणून केसेस टाकायला पाहिजेत

    उत्तर द्याहटवा
  2. ह्या चौथा खांब्याला पैश्याची वाळवी लागली आहे .

    उत्तर द्याहटवा
  3. ९९% पत्रकारिता ही बिकाऊ आहे
    माध्यमान मधून हवा मानाचा अंदाज पन SP😕 च्या सांगण्या वरुनच देत असावेत

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??