आपले ध्येय पुर्ण करण्यासाठी आलेली संधी कशी वापरायची याचं उत्तम उदाहरण


आपले ध्येय पुर्ण करण्यासाठी आलेली संधी कशी वापरायची याचं उत्तम उदाहरण




Zee मराठीवरील प्रसिद्ध 'होम मिनिस्टर'  या कार्यक्रमात मुंबईचे धारकरी कुमार खोत आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रियांका खोत यांनी त्यांच्या कुटुंबासहित २ जून २०१८ रोजी सहभाग घेतला. 

महाराष्ट्रभरातील घराघरात पाहिला जाणारा हा कार्यक्रम आणि आपल्याला आलेली संधी पाहून या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवप्रतिष्ठानचा एक धारकरी म्हणून कुमार खोत यांनी रायगडावर पुर्नसंस्थापन होणारे सुवर्ण सिंहासन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय घरोघरी पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाची तयारी म्हणून कुमार खोत यांनी त्यांच्या घरात सुवर्ण सिंहासनाचे फोटो दारात आणि घरातही लावले जेणेकरून कार्यक्रमातील चित्रीकरणात ते लोकांना दिसतील.

या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री. आदेश बांदेकर हे त्यांच्या कार्यक्रमात काही गाणी हावभाव करून कुटुंबातील लोकांना ओळखायला सांगतात. जर ती गाणी ओळखली गेली तर त्याबदल्यात काही रक्कम वहीनींना दिली जाते. यावेळी सौ. प्रियांका कुमार खोत यांनी  जिंकलेली सर्व रक्कम त्या कार्यक्रमात सर्वांसमोर रायगडावर पुर्नसंस्थापित होणाऱ्या सुवर्ण सिंहासनासाठी कर्तव्य निधी म्हणून अर्पण केली.

आदेश बांदेकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या होम मिनिस्टरच्या सर्वांना कुमार खोत यांनी सुवर्ण सिंहासनाचा केलेला संकल्प आणि पुर्नसंस्थापन याबाबत माहिती दिली. आपल्याला मिळालेली संधी कशी वापरायची हे शिवप्रतिष्ठानचे धारकरी चांगले जाणतात. आपल्या ध्येयापासून धारकरी दूर जात नाही याच उत्तम उदाहरण यावेळी दिसून आले !

धारकरी आणि त्यांचे कुटुंब आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी केलेल्या सुवर्ण सिंहासन संकल्पासाठी शक्य होइल त्या मार्गाने तो संकल्प लवकरात लवकर पुर्ण व्हावा यासाठी जिवाचे रान करत आहेत.



======

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा.
शिवचरित्र आणि सह्याद्री
www.facebook.com/shivcharitranisahyadri

आमचे Youtube video पाहण्यासाठी 
www.youtube.com/c/BalwantraoDalvi

Copyright (c) 2016 All rights reserved.

टिप्पण्या

  1. अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थानआहे
    ३२मण सुवर्ण सिंहासन

    उत्तर द्याहटवा
  2. अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थानआहे
    ३२मण सुवर्ण सिंहासन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??