ते अंध व्यक्ती म्हणाले, गुरुजी आम्ही दृष्टी असणाऱ्यांना दिशा दाखवतो !
"गुरुजी आम्ही या तुमच्या कार्यक्रमासाठी आलोय. आणि खास करून तुमचे दर्शन घ्यायला आलोय !"
पूणे - शनिवार दि. ७ जुलै रोजी पूण्यात संभाजीराव भिडे गुरुजी आणि त्यांची संघटना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे वारकरी धारकरी संगमाला हजारोंच्या संख्येंने धारकरी पुण्यात संचेती चौकात जमलेले.
संत तुकाराम महाराजांची पालखी येताच 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' असा गजर झाला. पालखी प्रमुखांनी भिडे गुरुजींना रथाचे स्वारथ्य करायला दिले आणि पालखी रथात मानाचे स्थान दिले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी येण्याला काही वेळ होता. रस्त्याच्या कडेला शिस्तीत बसलेल्या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी 'विठोबा रखुमाई' चा गजर वाढवला. काही वेळानंतर भिडे गुरुजी धारकऱ्यांच्या गर्दीत जाऊन अभंग श्लोक म्हणत दंग झाले. इतक्यात तिथे दोन व्यक्ती आले. धारकऱ्यांनी त्यांना भिडे गुरुजींपर्यंत जाण्यास वाट करून दिली.
भिडे गुरुजींनी त्या दोघांना नमस्कार केला. आणि त्यांची विचारपूस केली. त्यापैकी एक गृहस्थ म्हणाले, "गुरुजी, नमस्कार ! आम्ही अंध आहोत. आम्ही पुण्यातच राहतो आणि शिकवतो."
गुरुजींनी विचारलं, "म्हणजे अंध शाळेत शिकवता ?"
"नाही गुरुजी, आम्ही दृष्टी असणाऱ्याना शिकवतो ! त्यांना दिशा दाखवतो".
गुरुजींनी त्या दोघांकडे आश्चर्याने पाहिले आणि त्यांना नमस्कार करत पुन्हा हात जोडले केला.
"गुरुजी आम्ही या तुमच्या कार्यक्रमासाठी आलोय. आणि खास करून तुमचे दर्शन घ्यायला आलोय !" असं म्हणत त्यांनी गुरुजींच्या पायावर मस्तक टेकवले.
शेजारी बसलेले धारकरी आपल्या गुरुजींकडे आणि त्या अंध व्यक्तींकडे पाहत होते. विठू नामाचा गजर झाला अन सर्वांचे डोळे पाणावले.
तुझे नाम ओठी तुझे रुप ध्यानी
जिवाला तुझी आस का लागली ||
जरी बाप जगाचा परि तू
आम्हां लेकरांची विठू माऊली ||
हा प्रसंग कुठल्याही Media वर दाखवला नाही म्हणून हा प्रपंच करत आहोत !
Param aadarniya guruvarya Sambhaji Bhide guruji
उत्तर द्याहटवाTe andh व्यक्ती काय शिकवतात हे सांगा म्हणजे Mainstream Media दाखवेल
उत्तर द्याहटवाPranam giruji
उत्तर द्याहटवा