भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न फसला
.... आणि मिडियाची चोरी पकडली गेली !
पत्रकार, पत्रकारिता आणि Media म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असा प्रचार आणि प्रसार अनेक वर्ष सुरु आहे. अनेक पत्रकारांनी त्यांच्या लेखणीने सुवर्णकाळ गाजवलेला आहे. प्र. के. अत्रे पासून ते अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या अग्रलेखाने भल्याभल्यांना दरदरुन घाम सुटलेला आम्ही पाहिला आहे.
याच पत्रकारितेची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी भल्या भल्या मोठ्या नेत्यांचे स्टिंग ओपरेशन करुन त्यांची खोटी बाजू उघड केलेली आपण आजतागायत पाहिली आहे. आज त्याच्या उलट एक किस्सा घडला....
*** Now पत्रकार अरुनील **** ( नाव लवकरच उघड करु ) यांनी श्रीशिवप्रतिष्ठानचे मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांना फोन करून 'कोरेगाव - भिमा प्रकरणात अनिता साळवे यांनी ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा भिडे गुरुजी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रिटिशन दाखल केली यावर आपल मत मांडा' म्हणून विचारणा केली.
'८ महिन्यापूर्वी घडलेल्या दंगलीच्या घटने संदर्भात महाराष्ट्र सरकारने म्हणजेच मान. मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत सत्य सांगितले आहे आता त्यावर पुन्हा नवीन काय बोलणार ?' असं म्हणून बळवंतराव दळवींनी Media byte देण्यास नकार दर्शविला.
पुन्हा काही वेळाने त्याच व्यक्तीचा फोन आला की, "तुमच्या प्रतिष्ठानची बाजू मांडा. फक्त दोन मिनिटे बोला' असं म्हणत बळवंतराव दळवींची भेट घेतली.
.... आणि byte ला सुरुवात झाली. काही प्रश्न विचारल्यावर त्यावर सडेतोड उत्तर बळवंतरावांनी दिल्यानंतर अरुनील **** या पत्रकाराने आपण चहा घेउ आणि थोडा वेळ बोलु असं म्हणत बळवंतरावांशी संवाद साधायला घेतला .
"कैमेरा बंद कर !" असं म्हणत कैमेरामैनला कैमेरा फिरवून बंद करायला सांगितले आणि "आपण सहज गप्पा मारू" असं म्हणून 'कोरेगाव भिमा बद्दल बोलूया ' अशी चर्चा सुरु केली. त्यावर बळवंतराव दळवींनी स्पष्ट केले की,
"कोरेगाव भिमा हा विषय आमचा नाही. न तो काल आमचा विषय होता न आज आहे न तो उद्या असेल. आदरणीय गुरुजींचे नाव यात नाहक गुंतवले आहे आणि media मात्र गुरुजींचीच बदनामी करत आहे आमचा तुमच्यावरचा विश्वास उडाला आहे."
पुन्हा त्या पत्रकाराने अनेक प्रश्न फक्त कोरेगाव भिमा याबद्दलच विचारले. यावर मिडियाने भिडे गुरुजींची कशी बदनामी सुरु ठेवलीय यावर बळवंतराव दळवी बोलत राहिले.
"तुम्ही media वाले भिडे गुरुजी जे आंबाविषयी बोलले त्याचे सत्य का शोधत नाही ? का नाही तुम्ही बंगळूरला जाऊन आंब्यावर सुरु असलेली रिसर्च बाहेर काढत ? का नाही तुम्ही सत्याच्या मुळाशी जात ?"
पुन्हा त्या पत्रकाराने पुन्हा कोरेगाव भिमा हाच विषय सुरु केला. आता मात्र बळवंतराव दळवींना संशय येउ लागला. काहीतरी संशयास्पद हालचाल त्या पत्रकारासोबत आलेला कैमेरामैन करत होता हे दळवींना जाणवलं.
"ठिक आहे आम्ही निघतो." असं म्हणत ते पत्रकार उठु लागले. तेव्हा बळवंतराव दळवींनी त्या कैमेरामैनचा मोबाईल मागितला.
"काय झाल ? बंद आहे ओ मोबाईल !" असं म्हणत पत्रकारांचे चेहरे पडले. बळवंतराव दळवींनी मोबाईल unlock करून मागितला आणि पाहिला तेव्हा बळवंतराव दळवींचे लपुन काढलेले Video दळवींना दिसले. बळवंतराव दळवींनी "हे काय आहे ?"असं विचारताच त्यावर लगेच
"माफ करा ... Sorry Sorry !" असं म्हणत सारवासारव करायचा प्रयत्न झाला. आणि ते video डिलिट केले.
"मी नेता नाही, न मी मोठा पदाधिकारी, न मी कुठला आरोपी आणि न ही घोटाळेबाज मग हे स्टिंग का ? आम्ही म्हणूनच तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला अपेक्षित तेच आम्ही बोलाव म्हणून लपूनछपून video शूटिंग करून काय मिळणार होत माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडून ? मी तुम्हाला आधीच सांगितले की कोरेगाव - भिमा हा आमचा विषय नाही. तरीही हे असं का ?
उत्तर न देता ते पत्रकार निघून गेले.... त्यांना त्यांची चोरी पकडली गेल्यानंतर तोंड दाखवायला जागा राहिली नाही.
अशी माहिती देताना बळवंतराव म्हणाले,
" आदरणीय भिडे गुरुजींचा एक प्रसिद्ध श्लोक आहे ...
जगी हिंदू अष्टावधानी असावा !' याची प्रचिती आज आली !
बळवंतराव दळवी या शिवचरित्र इतिहासाच्या अभ्यासकाकडून कोरेगाव भिमाबद्दल वेगळी माहिती मिळेल आणि नंतर त्या माहितीच्या आधारे पुन्हा भिडे गुरुजी, शिवप्रतिष्ठानच्या विरोधात बोंबाबोंब सुरु करायचा मनसुबा बळवंतराव दळवींच्या अष्टावधानीपणाने उघडा झाला आणि चौथा खांब नागडा झाला हे मात्र खरे !!
यापुढे तुम्हाला उकसवून भडकावून तुमच्या तोंडातून काहीबाही वदवून घेउन त्यावर उलटसुलट बातमी लावली जाण्याची शक्यता आहे म्हणून जगी हिंदू अष्टावधानी असावा हे वाक्य प्रत्येक हिंदूनी लक्षात ठेवावे !
दादा हे आज घाडल का ?
उत्तर द्याहटवाहे हरामी चोर आहेत हे आत्ता तुम्ही अघड केलत हे बर झाल
आणि तुमची जागृत वृत्ती इथे उपयोगी पडली .
जगी हिंदू अष्टावधानी असावा
नाव उघड करा दादा..यांच्या बदनामीची काळजी आपण का करावी
उत्तर द्याहटवाBarbar
हटवालोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया पण आज या मीडिया वर चीमट भर सुद्धा विश्वास नाहीय... सत्य गोष्टी लपवून असत्य गोष्टी दाखवायच्या..ह्याचा जणू विडा उचलला आहे मीडियाने...दादा आपल्या जागृतपणामुळे त्यांची चोरी पकडली गेली.. आणि ह्या भिकारी मीडियाची पोल खोल केली..
उत्तर द्याहटवानीच अति नीच
उत्तर द्याहटवाकोणत्या वाहिणी चे होते
उत्तर द्याहटवालोकशाहीचा कुजलेला, वाळवी लागलेला, बुरसटलेला खांब(स्वयंघोषित).दादा त्याबिकारचोट पत्रकारच नाव घोषित करा
उत्तर द्याहटवामिडिया इतकी नीच पातळी गाठु शकते याची कल्पना करवत नाही. पण हे सत्य आहे.
उत्तर द्याहटवालोकशाहीचा चौथा खांब😂😂
उत्तर द्याहटवामीडिया ने धंदा मांडला आहे... त्या साठी ते कोणत्या पण थराला जावू शकतात....