..... खरचं मिर्च्या का झोंबतात ?

....खरचं मिर्च्या का झोंबतात ?

"तुम्ही माझ्या कार्यक्रमाची वाट लावली दळवी !" हे अत्यंत ह्रदयस्पर्षी वाक्य आहे जय महाराष्ट्र News चैनलच्या आशिष जाधव या राजकीय संपादकाचे ....

राज्यातील अनेक राजकीय नेत्यांवरील राजकीय गुन्हे राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर एका RTI कार्यकर्त्यांच्या माहिती अधिकारात अशी माहिती बाहेर आली की राज्य सरकारने एकूण ४१ गुन्हे मागे घेतले असून त्यामुळे हजारो जणांची न्यायालय फेरी बंद होणार आहे.

या ४१ गुन्ह्यात सांगलीतील काही गुन्हे आहेत जसे २००८ जोधा अकबर चित्रपटवेळी संविधानिक मार्गाने चित्रपटाचा निषेध नोंदवणाऱ्या भिडे गुरुजींवर कृष्णप्रकाशने केलेला लाठीचार्ज आणि त्यामुळे सांगलीतील लोकांनी चिडून केलेली तोडफोड आणि बंद वेळी भिडे गुरुजींवर आणि इतर शेकडो लोकांवर गुन्हे नोंद झाले होते.

सांगलीतील मिरजेत अफजलखान वधाच्या पोस्टवरुन गणेश मंडळांवर एका गटाने केलेला हल्ला आणि त्यानंतर उसळलेली दंगल यात दोन्ही बाजूकडील शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झालेले होते. पण भिडे गुरुजींच नाव यात मुख्य आरोपी म्हणून नसतानाही अनेकांनी भिडे गुरुजींच्या नावाने शिमगा केला.

याआधीच्या सरकारने सुद्धा असे अनेक राजकीय गुन्हे मागे घेतले होते अशी माहिती समोर आलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त भिडे गुरुजी यांच्यावरीलच गुन्हे मागे घेतले अशी आरोळी ठोकून रान उठवले गेले.

अशाच एका आरोळी ठोकणाऱ्या News चैनलने म्हणजे जय महाराष्ट्र चैनलने एक चर्चा ठेवून त्यात भिडे गुरुजी यांच्या बाजूने बोलायला मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांना स्टुडिओत बोलावले. चैनलचे राजकीय संपादक आशिष जाधव यांनी सुरुवातीपासूनच भिडे गुरुजींच्या विरूध्द गरळ ओकायला सुरुवात केली हे दिसून आले. पत्रकाराने निपक्षपाती असावं हा नियम जाधव विसरून संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांना जास्त वेळ बोलण्यास देत होते आणि शिवप्रतिष्ठानची बाजू मांडणाऱ्या दळवींना त्यांची बाजूच मांडू देत नव्हते. भिडे गुरुजी यांच्यावरील आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना बळवंतराव दळवीना अनेक वेळा मध्ये मध्ये थांबवल जात होत.
बळवंतराव दळवींना आशिष जाधवांनच उलटा प्रश्न केला की "हजारो जणांचे नाव त्यात असताना फक्त भिडे गुरुजींच्याच नावाने मिर्च्या का झोंबतात ?"  कार्यक्रम संपल्यानंतर आशिष जाधव दळवीना म्हणाले, "तुम्ही मध्ये मध्ये बोलून कार्यक्रमाची वाट लावलीत !"
त्यावर दळवी म्हणाले, "विषय आमचा असताना, आरोप आमच्यावर असताना तुम्ही आम्हाला वेळ का देत नव्हता ?"

एकेबाजूला कोकाटेला दिला जाणारा वेळ अन दुसऱ्या बाजूला दळवींना बोलूच न देणारे आशिष जाधव नक्की पत्रकारिता करत होते की प्रवक्ता म्हणून तिथ होते यावर सर्व स्तरातून प्रश्न उभे केले जात आहेत.
अशाच एका जय महाराष्ट्रवरील चर्चे दरम्यान बि. जे. कोळसे पाटील यांनी भटुकडे, हरामखोर अशी बेताल वक्तव्य केल्यावर त्यांना न रोखता त्यावर हे आशिष जाधव हसत होते हे लोकांनी पहिलेले आहे. अनेकांनी चैनलला फोन करून त्याचा निषेधही नोंदवला होता तरीही हे आशिष जाधव त्यांची वृत्ती बदलत नाही हे पाहून जय महाराष्ट्र News चैनलवर लोकांचा विश्वास राहिल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे !

आणखी अशाच एका चर्चेत TV ९ वर एका भाजप प्रवक्तांनी स्पष्ट केले होते की, 'या सगळ्या प्रकरणाची चौकशी होइल आणि त्यानंतर जर त्यात काही चुकीचे आढळल तर नक्कीच ...... ." 
त्या प्रवक्तांचे वाक्य पुर्ण होण्या आधीच TV 9 च्या पत्रकार निखिला म्हात्रे यांनी सरळ न्यायाधीशांच्या भुमीकेत शिरत, "अहो चौकशी काय करता भिडे गुरुजींवर कारवाई करा !" असे असंवैधानिक वक्तव्य केले होते. एखाद्या व्यक्तीवर आरोप सिद्ध होण्यासाठी चौकशी होणे गरजेचे असते इतकी साधी गोष्ट निखिला म्हात्रे विसरल्या आणि सरळ "कारवाई करा !" असा आदेशच देउ लागल्या हे पाहून या पत्रकारांनी नक्की कुठे पत्रकारिता शिकली असेल असा विचार करावासा वाटू लागलाय !

भिडे गुरुजींचे नाव येताच किंवा त्यांच्यावर चर्चा असताचं जय महाराष्ट्रचे आशिष जाधव आणि Tv 9 च्या निखिला म्हात्रे या त्यांची पत्रकारिता विसरून राजकीय पक्षाचे प्रवक्ते होताना दिसून येतात. भिडे गुरुजी यांचे नाव येताच यांना खरचं मिर्च्या का झोंबतात ??

काय आहे यामागचे इंगित ? कोण आहे यांचा बोलविता धनी ??

टिप्पण्या

  1. हिंदु धर्माची एलर्जी आहे ह्यांना स्वतःला पुरोगामी म्हणतात अन एका धर्माचा सार्वजनिक ठिकाणी द्वेष करतात हा टकल्या तर कोणाच्या तरी सांगण्याने च त्या खुर्चीवर बसलाय त्याची लायकी तरी आहे का??

    पत्रकार म्हणजे दोन्ही बाजू ऐकून घेतो तो पत्रकार हा कसला पत्रकार हा तर भाडखाऊ पत्रकार...

    उत्तर द्याहटवा
  2. बिकाऊ पत्रकारांची संख्या हल्ली वाढत चालली आहे ही एक चिंतेची बाब आहे.... हे पत्रकार नक्की कुणाच्या आदेशावर काम करतात ह्याची सखोल चौकशी करून ह्यांना तुरुंगात डांबले पाहिजेत कारण समाज्यात तेढ निर्माण होईल अशीच ह्यांची पत्रकारिता आहे...

    उत्तर द्याहटवा
  3. हे बिकाऊ पत्रकार आहेत.
    एखाद्या साध्या सोप्या विषयाचा विपर्यास करून आपल्या चैनेलवर बोंबा मारत बसायचं. एवढच जाणीव पूर्वक करतातात हे जाधव व म्हात्रे सारखे इमान विकणारे व स्वतःस पत्रकार म्हणवणारे......

    उत्तर द्याहटवा
  4. आशिष जाधवचतर हिंदुंनी खुपच वाकड केलेल दिसतय , हिंदुंविरोधात खुद्द बरळतो

    उत्तर द्याहटवा
  5. धारकरी अवधुत माजगावकर८ नोव्हेंबर, २०१९ रोजी ७:५४ AM

    दोन दोन लाख घेऊन दिवसभर बातम्या दाखवाऱ्यांकडून जास्त अपेक्षा करणं चुकीच ..जाधव नावची गोचढी आता झ24तास वर आलीय !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??