प्रकाश आंबेडकरांनी घातलं भिडे गुरुजींच्यासमोर सपशेल लोटांगण ?
प्रकाश आंबेडकरांनी घातलं भिडे गुरुजींच्यासमोर सपशेल लोटांगण ?
कोरेगाव - भीमा दंगलीनंतर संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या विरोधात जिवाचे रान करून भिडे गुरुजींनीच ती दंगल भडकवली अशी वल्गना करणारे... मुंबईसह महाराष्ट्रभरात बंद पुकारून महाराष्ट्राच्या करोडों रुपयांची होळी करायला दलित बांधवांना उकसवणारे भारीपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी १ जानेवारी ते १० नोव्हेंबर अशी एकूण ११ महिने संभाजीराव भिडे गुरुजींच्या विरोधात गरळ ओकुन महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता ?
काल जेव्हा कोरेगाव - भीमा चौकशी आयोगासमोर आंबेडकरांची चौकशी झाली तेव्हा मात्र प्रकाश आंबेडकरांनी एकदाही भिडे गुरुजींचे नाव घेतले नाही न त्यांना दंगलीचे सुत्रधार म्हटले. अगदी पूर्णपणे घुमजाव करत भिडे गुरुजींच्या विषयी सपशेल लोटांगण घातले असेच म्हणावे लागेल ...
पत्रकारांनी यासंबंधी विचारले असता, " सार्वजनिक ठिकाणी, सभेत लोकांना समोर बोलणे वेगळे आणि चौकशी आयोगासमोर बोलणे वेगळे !" अशी जाहीर कबुली दिल्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे असे घुमजाव पाहून पत्रकारांमध्येही याचीच चर्चा आहे !
आमच्या बातमीदाराकडून असे समजले आहे की, संभाजीराव भिडे गुरुजींचे काही प्रमुख धारकरी भिडे गुरुजींना प्रकाश आंबेडकर विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यासाठी आग्रह धरत असल्याची चर्चा शिवप्रतिष्ठानच्या वर्तुळात सुरु असल्याची कुणकुण बहुतेक प्रकाश आंबेडकरांना लागल्याने त्यांनी घाबरून आधीच सपशेल शरणागती घेत माघार घेतली असावी अशीही चर्चा सर्वत्र होत आहे !
यावर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, "प्रकाश आंबेडकर, संभाजी ब्रिगेड, बी. जे. कोळसे पाटील आणि यल्गार परिषदेच्या आयोजकांवर कोरेगाव भीमा दंगलीत हत्या झालेल्या राहुल फटांगळेच्या मृत्युसाठी जबाबदार धरून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा तसेच महाराष्ट्रातील वातावरण बिघडवून महाराष्ट्रात जातीयतेढ निर्माण करुन अराजकता माजवण्याचा कट रचणाऱ्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी व्हायला हवी अशी आमची आग्रही मागणी राहिल. कोरेगाव भीमाच्या दंगलीमागील खरे सुत्रधार आता समोर आलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या खोट्या आरोपाचीच रीघ पुढे अनेकांनी ओढली म्हणून प्रकाश आंबेडकरांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांची जाहीर माफी मागावी !"
©दिव्यदृष्टी blogspot
तुमचा नाव नंबर सेंड करा.....
उत्तर द्याहटवाज्याचं पेज आहे तो
Lonch ghalnar ahes ka
हटवा👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवा*भीमकोरेगाव प्रकरणी भिडे आणि एकबोटेला वाचवू पाहणाऱ्या सरकार आणि पोलीस खात्यास ऍड.प्रकाश आंबेडकरांनी आणले अडचणीत*
उत्तर द्याहटवाआज दि. 13 नोव्हेंबर रोजी ऍड.प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदविली आणि हल्ल्यांचे आरोपी असलेल्या भिडे व एकबोटे यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस खात्याचा चेहरा उघडा पाडला. सोबतच हल्ले वेळेत थांबवण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणविस हेच या घटनेस जबाबदार असल्याचे आंबेडकर यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. ऍड.प्रकाश आंबेडकर वाढू गावच्या सरपंचाची उलट तपासणी करणार होते पण आपण गोत्यात येऊ या भितिने सरपंच आज चौकशी आयोगासमोर गैरहजर राहिल्या.
ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर मांडलेले मुद्दे थोडक्यात..
- ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर सांगितले की, कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हिंसाचारास सुरुवात झाली. त्याची माहिती मला मिळताच त्या क्षणी मी पुणे ग्रामीण पोलिसांशी फोन वरुन संपर्क साधला. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या घटनेला मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना यासोबतच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहेत. या सर्वांनी आयोगासमोर उपस्थित राहावे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक जानेवारील कोरेगाव भीमा गावापासून ४० किलोमीटर अंतरावर असताना दंगल सुरु झाली. मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यात कार्यक्रमासाठी होते. मुख्यमंत्र्यांना दंगलीची माहिती दिली गेली का? सकाळी पावणे दहा वाजता सुरू झालेला हिंसाचार पुढे सहा तास कसा सुरु राहिला? राज्य सरकारमधील मंत्री कोरेगाव भीमामधे १ जानेवारीला हजर होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली का? मुख्यमंत्र्यांनी हिंसाचार शमवण्याचे आदेश दिले का आणि दिले असतील तर ते का पाळले गेले नाहीत, असे सवाल आंबेडकर यांनी या वेळी उपस्थित केले.
- ऍड.प्रकाश आंबेडकरांनी कोर्टात पोलीसांनी दिलेले प्रतिज्ञा पत्रच वाचून दाखविले ज्यामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. तरीही पोलीस कार्यवाहीत दिरंगाई करून आरोपींना वाचवायचा प्रयत्न करीत आहेत हे चौकशी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.
- पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी बिनसरकारी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी बिगर सरकारी व्यक्तींची समिती गठीत केली. पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे हे त्या समितीचे अध्यक्ष होते. मात्र या समितीने दिलेला अहवाल मान्य न झाल्याने अशी कोणती समिती आम्ही गठितच केली नव्हती असं सरकारने म्हटल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
- कोरेगाव भिमामधे एक जानेवारीला हिंसाचार सुरू झाला तेव्हा मी पुण्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना पाचवेळा फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. लॅन्डलाईनवरही फोन केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही, असे ऍड.प्रकाश आंबेडकरांनी या वेळी सांगितले. कोरेगाव आणि आजुबाजुच्या पाच गावांतील ग्रामपंचायतींनी एक जानेवारीला बंद पुकारला, याची माहिती या गावांमधील ग्रामसेवकांनी २० डिसेंबरलाच पोलिसांना दिली होती.
एक जानेवारीला सकाळी वढु गावामधे समस्त हिंदू आघाडीकडून काढण्यात आलेल्या रॅलीला स्थानिक पोलिसांनी परवानगी दिली होती का? दिली असल्यास या रॅलीच्या बंदोबस्तासाठी किती पोलिस तैनात करण्यात आले होते? त्यांची नावं काय? या दरम्यान वायरलेसवरुन आणि वोट्स अॅपवरुन पोलिसांमध्ये काय संवाद साधण्यात आला याची माहिती देण्याची मागणी आंबेडकर यांनी या वेळी केली.
- ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे उपस्थित असलेले मंत्री, पोलिस अधिकारी, गुप्तचर खात्याचे प्रमुख, भीमा कोरेगाव वढू भागातील ग्रामसेवक अश्या सरकार, पोलीस आणि प्रशासनातील अनेकांना चौकशी आयोगासमोर बोलावण्याची मागणी केली.
ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर आज आपली साक्ष नोंदवुन दंगल भडकविणारे भिडे व एकबोटे आणि हल्ले थांबवण्यास अपयशी ठरलेले, आरोपींना अभय देणाऱया सरकार, पोलीस आणि प्रशासनाला चांगलेच उघडे पाडुन यासर्वांच्या अडचणी वाढवल्याचे दिसते आहे. ऍड.प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना भीमा कोरेगाव चौकशी आयोगाच्या कचाट्यात ओढल्यामूळे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सुध्दा आरोपी होऊ शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे.
Agdi yogy bollat saheb
हटवाजय शिवराय
उत्तर द्याहटवाjay shivray
हटवाJay bhavani Jay shivaji
हटवामस्त शिवसुर्यजाळ निघाला पक्या च्या कानाखाली
उत्तर द्याहटवाRight
हटवाRight
हटवागुरुजी म्हणालेच होते
उत्तर द्याहटवाथोडं थांबा
सत्य आपोआपच बाहेर येईल.
जय शिवराय
शिवराय असे शक्तीदाता
उत्तर द्याहटवाजय शिवराय
उत्तर द्याहटवाप्रकाश आंबेडकरला शिक्षा व्हायला पाहिजे
उत्तर द्याहटवाअसं काही घडलंच नाही ...प्रकाश आंबेडकर यांनी एका साक्षीदाराच वकीलपत्र घेतलं आहे. ते इत्तरांची साक्ष घेतील..त्यांच्या स्वतःच्या साक्षीचा तिळमात्र संबंध नाही. मनोहर भिडे च्या चेल्यांकडून खोटं नाट पसरवल जात आहे ..त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे..
उत्तर द्याहटवादिव्या दृष्टी चे संपादक आणि सहकारी किती मुर्ख असू शकतात हे ह्या लेखावरून कळते
उत्तर द्याहटवासत्याचा नेहमी विजय च होतो..
उत्तर द्याहटवा