पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रावणाची स्टटंबाजी आणि दलित बांधवांची दिशाभूल

इमेज
रावणाचा स्टंटपणा आणि दलित बांधवांची दिशाभूल उत्तर प्रदेश मधील सहारनपुर येथे झालेल्या जातीय दंगलीचा मुख्य सुत्रधार आणि आरोपी असलेला चंद्रशेखर आझाद उर्फ रावण याला १४ महिन्यांची शिक्षा झाली होती.   असा हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रावण अचानकपणे ऐन १ जानेवारीच्या तोंडावर महाराष्ट्रातील कोरेगांव भीमा येथील विजयस्तंभ स्मारकाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रात येण्याचा आग्रह धरतो काय आणि त्याला मिडिया डोक्यावर घेते काय ......  सगळचं आधीच प्रिप्लान ठरल्याप्रमाणे घडतं ! या रावणाने २०१४ ला एक नवीन संघटना सुरु केली. त्याचा मुख्य उद्देश हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष आणि त्यांना २०१९ ला सत्तेपासून रोखणे. याबद्दल हा रावण जाहीरपणे हे बोलतोही. आधीच दलित बांधव वेगवेगळ्या संघटनांच्या गराड्यात अडकलाय आणि याने आणखी एक वेगळी संघटना सुरु केली. काय तर म्हणे बहुजनांचे एकत्रीकरण करायचे आहे. हा काल मुंबईत आला. याने आग्रह धरला की याला वरळीत सभा घ्यायचीय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याला परवानगी नाकारली. तशी परवानगी पोलीस अनेकांना अनेक कारणामुळे नाकारतात. पण पुन्हा ठरवल्याप्रमाणे...

दलित बांधवांना सत्य समजलं ?

इमेज
दलित बांधवांना सत्य समजलं ? आंबेडकरी चळवळीशी ज्यांची नाळ जोडली गेलीय असे अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नेहमीच समाजासोबत देशहिताचा विचार करताना आढळतात. त्यांना राजकारणापेक्षा दलित हित जास्त महत्त्वाचे वाटते म्हणूनच की काय त्यांना काही राजकारणी लोक नेहमीच दूर ठेवतात.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थाने मानणारा दलित समाज कधीच राजकीय लोकांच्या राजकारणाला बळी पडला नाही. तो नेहमीच आपल्या तत्वाला धरून आंबेडकरी चळवळ सुरु ठेवत राहिला, जपत राहिला ! समाज हितासोबतच देशहित महत्त्वाचे हे जाणूनच १ जानेवारी २०१८ ला झालेली ( ठरवून केलेली ) कोरेगाव - भीमा दंगलीला महाराष्ट्रातील दलित बांधवांनी महाराष्ट्रभरात पसरू दिले नाही. या दंगलीला जबाबदार म्हणून ज्यांची नावे समोर आली होती ते संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात एकही सबळ ठोस पुरावा नसतानाही काहींनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला वेठीस धरून महाराष्ट्राचे करोडो रुपयाचे नुकसान करून महाराष्ट्राची संपत्ती जाळून भस्मसात केली. का ? तर त्यांना महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य हवे होते म्हणून....  ही गोष्ट महाराष्ट्रातील द...