दलित बांधवांना सत्य समजलं ?
दलित बांधवांना सत्य समजलं ?
आंबेडकरी चळवळीशी ज्यांची नाळ जोडली गेलीय असे अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नेहमीच समाजासोबत देशहिताचा विचार करताना आढळतात. त्यांना राजकारणापेक्षा दलित हित जास्त महत्त्वाचे वाटते म्हणूनच की काय त्यांना काही राजकारणी लोक नेहमीच दूर ठेवतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थाने मानणारा दलित समाज कधीच राजकीय लोकांच्या राजकारणाला बळी पडला नाही. तो नेहमीच आपल्या तत्वाला धरून आंबेडकरी चळवळ सुरु ठेवत राहिला, जपत राहिला !
समाज हितासोबतच देशहित महत्त्वाचे हे जाणूनच १ जानेवारी २०१८ ला झालेली ( ठरवून केलेली ) कोरेगाव - भीमा दंगलीला महाराष्ट्रातील दलित बांधवांनी महाराष्ट्रभरात पसरू दिले नाही. या दंगलीला जबाबदार म्हणून ज्यांची नावे समोर आली होती ते संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात एकही सबळ ठोस पुरावा नसतानाही काहींनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला वेठीस धरून महाराष्ट्राचे करोडो रुपयाचे नुकसान करून महाराष्ट्राची संपत्ती जाळून भस्मसात केली. का ? तर त्यांना महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य हवे होते म्हणून....
ही गोष्ट महाराष्ट्रातील दलित बांधवांना नक्कीच समजली म्हणूनच त्यांनी मार्च महिन्यात प्रकाश आंबेडकरांनी काढलेल्या भिडे गुरुजींच्या विरोधातील मुंबई मोर्चाकडे पाठ फिरवली आणि मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या भारिप महासंघांचे फक्त २५ हजार कार्यकर्ते जमले होते. जर सर्वच दलित बांधवांचा विरोध असता तर हे संख्या लाखोंत गेली असती. दलितांच्या नावाने धुडगूस घालून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यात फारसं यश आले नाही.
भिडे गुरुजींच्या विरोधात रान उठवूनही भिडे गुरुजी महाराष्ट्रभरात श्रीशिवाजी - श्रीसंभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास सांगत फिरत आहेत आणि त्यांच्या कार्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे हे पाहून विरोधक आणखीच चिडले.
भिडे गुरुजींच्या विरोधाचा कट फसला ...
काल परवा मुंबईतील लालबाग येथे भिडे गुरुजींचे व्याख्यान आयोजित केले गेले होते. सुरुवातीला हे व्याख्यान उघड्या मैदानात असल्यामुळे पोलिसांनीच परवानगी नाकारली. पण त्यानंतर भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था पाळत एका बंदिस्त सभागृहात झालेल्या व्याख्यानाला गुरुजींच्या धारकऱ्यांनी मोठ्या संख्येंने उपस्थिती दर्शवली होती.
सुरुवातीला पोलिसांना वाटल की भिडे गुरुजींना प्रचंड विरोध होइल. हजारो दलित बांधव गुरुजींना विरोध करत निषेध नोंदवतील.... पण असं घडलं नाही... गुरुजींना विरोध करायला आलेली चार दोन टाळकी ही आंबेडकरी विचारांची दलित बांधव नव्हती तर ती सगळी दलित बांधवांच सोंग घेउन राजकीय लाचारी स्विकारलेली राजकारणी होती. त्यांना हवी होती प्रसिद्धी .... त्यांना भिडे गुरुजींना विरोध केला असं दाखवून दलित मतांचे राजकारण करायचं होतं. पण दलित बांधवांनी मात्र या विरोधामागील सत्य जाणलं होतं म्हणूनच यावेळीही दलित बांधवांनी यापासून दूर राहुन गुरुजींना विरोध केला नाही. जर पोलिस आणि कोर्टाने कोरेगाव भीमा दंगलीत संभाजीराव भिडे गुरुजींचा हात नव्हता आणि त्यावेळी ते पुण्यातही उपस्थितही नव्हते हे स्पष्ट केल्यानंतरही भिडे गुरुजींना विरोध करायच कारणचं उरलं नव्हतं...
दलित बांधवांनी राजकारणी लोकांच्या राजकारणाला बळी न पडता या सर्वापासून दूर राहून दलित मतांच राजकारण करणाऱ्यांना तोंडावर पाडलं हेच मुंबईतील लालबागच्या भिडे गुरुजींच्या व्याख्यानावेळी स्पष्ट झाले आहे ! आता या देशाची संपत्ती ती आपली संपत्ती .... देशाचे नुकसान ते आपलं नुकसान आहे हे ओळखणाऱ्या दलित बांधवांनी यावेळी खरचं प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मी आधी भारतीय आहे नंतर माझी जात येते ' या राष्ट्रप्रथम असणाऱ्या देशहिताच्या विचारांना प्राधान्य दिल्याबद्दल दलित बांधवांचे कौतुक करावं तेवढ कमीच !
यापुढे महाराष्ट्रातील जातीपातीच्या गलिच्छ राजकारणाला कोणीही थारा देणार नाही हे मात्र खरे !!!
अगदी बरोबर आहे..🙏
उत्तर द्याहटवाचपराक
उत्तर द्याहटवा