रावणाची स्टटंबाजी आणि दलित बांधवांची दिशाभूल
रावणाचा स्टंटपणा आणि दलित बांधवांची दिशाभूल
उत्तर प्रदेश मधील सहारनपुर येथे झालेल्या जातीय दंगलीचा मुख्य सुत्रधार आणि आरोपी असलेला चंद्रशेखर आझाद उर्फ रावण याला १४ महिन्यांची शिक्षा झाली होती. असा हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रावण अचानकपणे ऐन १ जानेवारीच्या तोंडावर महाराष्ट्रातील कोरेगांव भीमा येथील विजयस्तंभ स्मारकाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रात येण्याचा आग्रह धरतो काय आणि त्याला मिडिया डोक्यावर घेते काय ......
सगळचं आधीच प्रिप्लान ठरल्याप्रमाणे घडतं !
या रावणाने २०१४ ला एक नवीन संघटना सुरु केली. त्याचा मुख्य उद्देश हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष आणि त्यांना २०१९ ला सत्तेपासून रोखणे. याबद्दल हा रावण जाहीरपणे हे बोलतोही.
आधीच दलित बांधव वेगवेगळ्या संघटनांच्या गराड्यात अडकलाय आणि याने आणखी एक वेगळी संघटना सुरु केली. काय तर म्हणे बहुजनांचे एकत्रीकरण करायचे आहे.
हा काल मुंबईत आला. याने आग्रह धरला की याला वरळीत सभा घ्यायचीय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याला परवानगी नाकारली. तशी परवानगी पोलीस अनेकांना अनेक कारणामुळे नाकारतात. पण पुन्हा ठरवल्याप्रमाणे मिडियाने हा विषय रंगवायला सुरु केला. मग संविधान बचावा च्या नावाने चर्चा रंगल्या ... अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी सुरु आहे यावर जोरदार गरमागरम घडाजंगीही झाली....
आता हा रावण दलित बांधवांच्या हितासाठी काम करतो असं म्हणतात पणा नेता महाराष्ट्रात येतो पण गेले अनेक वर्षे आंबेडकरी चळवळ ज्यांनी सुरु ठेवली आहे अशा रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर यांना न भेटता तो पुण्याला जाण्याचा आग्रह धरतो. याच्या पेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठी असलेली ही आंबेडकर चळवळीतील नेते मंडळी यांनी मात्र या रावणाला भेटण्याचे टाळले. आणि हा रावणहि त्यांना भेटायला गेला नाही. महाराष्ट्रात आल्या आल्या महाराष्ट्रातील दलितांसाठी काम करणाऱ्या नेत्यांना भेटला असता महाराष्ट्रातील बांधवांची व्यथा काय किंवा त्यांना काय वाटतं हे समजून घेतल असतं तर ते जास्त योग्य झाल नसतं काय ? पण हाही रावण अहंकारीच निघाला ......
ऐन १ जानेवारीच्या आधी महाराष्ट्रात येउन याला काय सिध्द करायचं ? हा याआधी कधी त्या स्मारकाला भेट द्यायला का नाही आला ?? यालाही दलित मतांचच राजकारण खेळायचं आहे म्हणूनच ना ??? कोणीही सोम्या गोम्या उठतो काय आणि दलितांचा नेता बनायला बघतो काय ..... का ? आमच्या महाराष्ट्रातील दलित नेते त्या तोडीचे नाही काय ?? की हा त्यांना कमी लेखण्यासाठीच महाराष्ट्रात येतोय ?
याला सभाच घ्यायचीय ना ? घे म्हणावं १ जानेवारी नंतर कुणी रोखलयं ?? पण १ जानेवारीनंतर यांना यांच जातीय राजकारण करता येणार नाही न ... हीच तर खरी गोची आहे !
©दिव्यदृष्टी २०१८
divyadrushti.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा