संभाजीराव भिडे गुरुजी यांची डिगरी आणि शिक्षण

भिडे गुरुजींच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावर त्यांच्या धारकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया

BBC मराठी आणि TV9 वाल्यांनी कोणतीही पुर्ण माहिती न घेता कुठल्यातरी अर्धवट माहितीवर फेकाफेकी केली...  मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली प्रतिक्रिया... 

"ज्यांनी ६०- ७० वर्षापुर्वी संन्यस्त जीवन जगायच आणि फक्त देव देश आणि धर्मासाठी कार्य करायच अस ठरवून आपलं घर त्यागलं... आपले नातेवाईक त्यागले ... असलेली नसलेली संपत्ती सोडून दिली ... संन्यस्त जगायच म्हणून पायात काहीही न घालता अनवाणी फिरतात ... ज्यांच्याकडे स्वतःच अस काही नाही.... जे दुसऱ्याने दिलेल्या १० बाय १० च्या घरात राहतात .... इतकचं काय तर ज्या घरात राहताय त्याला साधं कुलुपही लावत नाही.... ज्यांनी देव देश धर्मासाठी सर्वस्व त्यागले आहे अशा त्यागी ... योगी ... शिवतपस्वी महनीय व्यक्ती ६० - ७० वर्षापुर्वीचे 
आपले शिक्षणाचे सर्टिफिकेट सोबत घेउन फिरतील असा विचारच काहींच्या डोक्यात येतो कसा ??

आज ती सर्टिफिकेट असली काय आणि नसली काय त्याने आदरणीय गुरुजींना मानणाऱ्या लाखों धारकऱ्यांना त्याने काय फरक पडणार आहे ? आम्ही आदरणीय गुरुजींचे धारकरी झालो ते त्यांचे शिक्षण काय... ते कुठल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते ... त्यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे .... आमचा फायदा काय .... आम्हाला पद मिळणार आहे की नाही हे पाहून आदरणीय गुरुजींचे धारकरी झालेलो नाहीय ...
 आदरणीय गुरुजींनी सांगितलेल्या श्रीशिव-शंभू मार्गावर चालायला तयार झालो ते त्यांनी आम्हाला दाखवलेला, शिकवलेला आणि जाणवून दिलेला श्रीशिवछत्रपती - श्रीशंभूराजे हे दोन महामंत्र आम्हाला त्यांच्यापाशी घेउन आले आहेत.  गुरुजींनी आम्हाला काय दिलय हे शब्दात न सांगता येणारे आहे ... म्हणूनच त्यांची प्रॉपर्टी किती ... डिगरी कोणती हे आमच्यासाठी महत्वाची नाहीय ... न त्याची  आम्हाला गरज आहे...

सोशल मिडियावर कोणी काही लिहिल, संबोधले म्हणून त्याचा पुरावा आदरणीय गुरुजींनी द्यावा ??
तरीही ..... 

आदरणीय गुरुजींच्या आधी आम्ही धारकरी समर्थ आहोत उत्तर द्यायला ....

ज्या BBC मराठीच्या याकुत अलीने  लिहिलेल्या काही ओळी स्वतःला हव्या तश्या पसरवायच्या ... आणि सत्य लपवायच हे उद्योग बंद व्हावे म्हणून त्याच पोस्टमधील काही ओळी इथे मांडत आहे ....

शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितिनदादा चौगुलेंनी  माहिती देताना सांगितले होते की,
 "आदरणीय गुरुजी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते .... "
( पण तरीही BBC मराठी वाल्यांनी खोडसाळपणे 
जाणीवपूर्वक ....  "मिळालेल्या माहितीनुसार भिडे गुरुजी फर्ग्युसन मध्ये विद्यार्थी होते " अस सांगून नंतर त्याच गोष्टीला मोठ करून ...  गुरुजी विद्यार्थी नव्हते अस बोंबाबोंब केली ... म्हणजे जी गोष्ट नितिनदादा बोललेच नाही ती गोष्ट शोधायला BBC वाले निघाले ....)

याच BBC मराठीच्या पोस्ट मध्ये त्यांनीच अस लिहिल आहे की, 
BBC वाल्यांनी फर्गुसनच्या सदस्याशी बोलण केल्यानंतर त्यांनी अस सांगितले की,
"भिडे गुरुजी प्राध्यापक होते.  पण कधी ते नक्की सांगता येणार नाही" याचा सरळ साधा अर्थ असा की फर्ग्युसन वाल्यांनी स्वतः मान्य केल असतानाही खोट बोल पन रेटुन बोल अस त्या BBC मराठी वाल्यांनी केले आहे ...

नितीनदादांनी जे चूक आहे ते चूक म्हटल ...
काय म्हणाले नितिनदादा चौगुले ... .
१) १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार गुरुजींना मिळाले ही सोशल मीडियावरील माहिती  खोटी आहे 
२) आदरणीय गुरुजी नासात सल्लागार होते अस आम्ही कधीच म्हटलेले नाही...  ही सोशल मिडियावरील माहिती कोणीतरी जाणीवपूर्वक पसरवली गेली आहे ..
३) डॉक्टरेटच्या ६७ संशोधकांचे आदरणीय गुरुजी गाईड ( सल्लागार ) होते ही माहिती आम्ही कधीच सांगितली नाही ... ही माहिती चुकीची आहे !
हे सगळ त्याच BBC  मराठीवर त्यांनीच लिहिल आहे ... पण ज्यांना डोक नाही त्यांनी अर्धवट वाचून नुसतीच बोंबाबोंब सुरु केली .... !

हे वाचून तरी  त्या TV 9 आणि अनेकांची नसलेली अक्कल ठिकाण्यावर येइल असे वाटते म्हणून हा प्रयत्न ...

                  - बळवंतराव दळवी
              श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
        
संदर्भ  - BBC मराठी वरील पोस्ट आणि Tv 9 वरील बातमी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??