हिंदूंची मंदिरे का तोडली जातात ? कारणे व उपाय
मंदिरे ही हिंदूंची अस्मिता आहे आणि या अस्मितेला कोणत्याही प्रकारचा धक्का बसला की निश्चितच
आपल्याला त्याचा राग येतो. बऱ्याचदा हिंदूंच्याच चुकीमुळे अनेक वेळा प्राचीन मंदिरेही महानगरपालिका / सरकार / विकासकाकडून तोडली जातात. आपल्या शेजारील, विभागातील एखाद्या मंदिराला नोटीस आली की मग आपली धावपळ सुरू होते, आणि हाती निराशा येते.
या विषयाबाबत भरपूर दिवस अभ्यास करत होतो त्यानुसार या लेखात काही कारणे सांगणार आहे आणि त्यावर उपायही सांगणार आहे ... तेंव्हा लेख पूर्ण वाचा.
आपल्या विभागातील जुन्या मंदिरांना नोटिस का येतात त्याची कारणे --
प्रथमतः मंदिर आणि घर यात फार मोठा फरक असतो. काही चांगले सज्जन, धार्मिक लोक आपल्या घरात /घराजवळ एखाद्या जागेत /एखाद्या पवित्र ठिकाणी /झाडाखाली एखादया प्राचीन मूर्तीची स्थापना करतात. आणि मग त्या देवांची तिथे पूजा अर्चा करतात. आता निश्चित अशा प्रकारे स्थापना करणारे जे धार्मिक घराणं आहेत त्या काळात मंदिराबाबत कोणतीही कागदपत्रे ठेवत नाहीत, त्यांच्यासमोर तसा प्रश्न उद्भवत नाही. मग त्यांची हयात संपली की त्यांच्या पुढील पिढीस ते सर्व हस्तांतरित करतात. मग आता चूक इथे अजाणतेपणे होते. आता किमान ५० - १०० वर्षाचा काळ उलटलेला असतो मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असतो. पण त्याचे काहीही कागदपत्रे आपण बनवत नाही. वीजेचे बिल घेत नाही. आपले मंदिर न्यास ( मंदिर समिती स्थापन ) करत नाही. किंवा न्यासाच्या कार्यालयात त्याची नोंदणी करत नाही. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने सल्ला दिला की वरील सर्व बाबींची पूर्तता केल्यास मंदिराचा शासन कागदपत्र मध्ये मंदिर म्हणून उल्लेख होईल. मात्र अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल जात. यात त्यांचा 'मी' पणा आडवा येतो. उलट उत्तर देतात -'हें मंदिर माझ्या आजोबा/पणजोबा यांनी स्थापन केलय इथे माझच चालेल.' एक दोन पिढ्या गेल्या की काही वर्षांनी देव न करो पण एकाच्या चुकीमुळे सर्व समाजाची श्रध्दा वेठीला धरली जाते. कधीकधी मिळणाऱ्या पैशाच्या मोहाला बळी पडत जागा / चाळ मालक हेही ती जागा द्यायला नकार देतात. सोसायटीमधे असलेले मंदिर हे सेक्रेटरी अध्यक्ष पाहत असतात पण शासन दरबारी काही नोंद करत नाहीत. मग काही वर्षांनी सोसायटी पुनर्बांधणीला जाते तेंव्हा मग विकासक मंदिराला जागा द्यायची की नाही असा प्रश्न उभा राहतो. विकासकाला जागा देताना जागा मालक म्हणतो माझी जागा आहे मी काहीही करीन. आणि सरतेशेवटी मंदिर पाडण्याची नोटीस येते, आणि मग हिंदू समाज खडबडून जागे होऊन धावपळ करायला लागतात आणि हिंदू समाजाला आवाहन करतात आता समाजाची आठवण येते. तोपर्यंत काही उपाय नसतो आणि दुर्दैवाने ते प्राचीन मंदीर हिंदूंच्या चुकीमुळे तोडली पाडली जातात.
आपली जुनी मंदिरे वाचवयाचे उपाय -
अनेकदा काही ठिकाणी मूर्ती स्थापन ही घरातच केलेली असते. सर्वप्रथम आपल्या समाजात आजूबाजूस जी मंदिर असतील त्यांच्या जागा मालकांना / मंदिर स्थापन करणाऱ्या घराला मंदिराची रचना बदलून कळस असलेल मंदिर बांधायला लावा. आणि ते बांधताना आर्किटेक्टकडून योग्य ते कागदपत्र घ्या. आपल्या विभागाचे भूमापण अधिकारी यांच्याकडून भूभाग क्रमांक मिळवून सदर जागेचा मुळ आराखडा प्रत (टिक्का शीट कॉपी) मागवून घ्या. (ऑनलाईन उपलब्ध आहे) जर न्यास स्थापन केली नसेल तर अशा घराला सांगा दादा तुम्ही प्रमुख पद घ्या पण न्यास स्थापन करा. ज्या न्यासमध्ये काही पदाधिकारी आणि काही सदस्य असतील. त्या न्यासाची नोंदणी आपल्या विभागाचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे करावी. मंदिराचे जुने फोटो, प्रत्येक वर्षी प्रत्येक बाजूचा व मूर्तीचा फोटो काढून सांभाळून ठेवावा. वीज वितरण कंपनीकडून न्यासाचे नावे वीजबिल घ्यावे. वीज वितरण कंपनी मंदिराच्या वीजदरात सूट देतात. आणि जर मंदिराचे सर्व कागदपत्र व्यवस्थित असेल / नसेल तरी आपल्या नगरपालिका , नगरपरिषद, जिल्हा प्रशासन , MMRDA यांच्या अधिकाऱ्याकडे जाऊन सदर जागा कोणत्या कारणासाठी आरक्षित आहे की नाही? उदा.कधीकधी ग्रीन झोन असू शकतो , रस्ता नियमित रेषा आहे का?, रस्ता रुंदीकरण प्रस्ताव आहे का ? याची खात्री करा. असेल, नसेल तरी प्लानची प्रत घ्या. असेल तर आपल्या विभागाचे नगरसेवक, आमदार यांना ही बाब लक्षात आणून दया आणि त्यांच्यामार्फत प्रशासनवर दबाव आणून पुनर्रचना करून सदर आरक्षण काढून टाकायला लावा.
आपल्या काही चुकीमुळे आपले हिंदू मंदिर तुटू नये यासाठी केलेला हां खटाटोप आहे. वरील सर्व गोष्टींची पूर्तता केली की आपल्या मंदिराला कुणी हातही लाऊ शकत नाही. इतर धर्मातील लोक त्यांची प्रार्थनास्थळ बांधताना / जुनी बांधलेली असतील अशा सर्व प्रार्थनास्थळाचे कागदपत्र बनवतात व सांभाळतात, मग आपण का नाही? आपल्या चुकांमुळे अनेक प्राचीन मंदिरं तुटली गेली आता यापुढे तरी वाचवता येईल ! तर आपणही आपल्या आसपास मंदिरांची कागदपत्रे आहेत का ते पहा, नसेल तर कामाला लागा.
उभा पाठीशी श्रीहरी संकटात,
असे वज्र निर्धार ज्यांच्या उरात॥
- आदित्य दत्ताराम गायकवाड
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई

( ८ सप्टेंबर २०१९ )
काही अडचण असल्यास संपर्क करावा
7021443703 / 8424841644
काही अडचण असल्यास संपर्क करावा
7021443703 / 8424841644
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा