ही राजकीय खेळी अशी असेल तर ?

राजकारणातील चाणक्य .... राजकारण म्हटल की हा शब्द सर्रासपणे वापरला जातो. जो तो राजकीय पक्ष आपआपली राजकीय खेळी खेळत असतो. काहींची खेळी नावाजली जाते तर काहींची सपशेल फसतेही. सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला राजकीय खेळी म्हणायचं की महाराष्ट्रासाठी न भुतो न भविष्यती अस काही वाईट घडत आहे हेच भल्याभल्यांच्या लक्षात येत नाहीय. भाजपावाले मोदी आणि शहांना चाणक्य म्हणून गौरवत आहेत. तर राष्ट्रवादीवाले शरद पवारांचा तसा उल्लेख करत आहेत. या सर्व खेळात शिवसेना अडकलीय. नक्की कोण सेनेचा वापर करत आहेत हे अजून शिवसेनेच्या लक्षात येत नाहीय. भाजपाला जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ मिळाली होती तेव्हा त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्यासारख "आम्ही विरोधी बाकावर बसणार" म्हणत शिवसेना - राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची अनैसर्गिक यूती होउ दिली. शिवसेनेच्या हातातून सर्व सुत्र निघून गेली होती. आता सुत्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी खासकरून शरद पवारांच्या हातात आली. शरद पवार साहेब हे असं व्यक्तीमत्व आहे ज्यांना हा देश अजूनही समजू शकला नाहीय. ते काय करतील काही नेम नाही. आणि घडलही तसच .... बैठकावर बैठ...