ही राजकीय खेळी अशी असेल तर ?


राजकारणातील  चाणक्य ....

राजकारण म्हटल की हा शब्द सर्रासपणे वापरला जातो. जो तो राजकीय पक्ष आपआपली राजकीय खेळी खेळत असतो. काहींची खेळी नावाजली जाते तर काहींची सपशेल फसतेही. सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला राजकीय खेळी म्हणायचं की महाराष्ट्रासाठी न भुतो न भविष्यती अस काही वाईट घडत आहे हेच भल्याभल्यांच्या लक्षात येत नाहीय.

भाजपावाले मोदी आणि शहांना चाणक्य म्हणून गौरवत आहेत. तर राष्ट्रवादीवाले शरद पवारांचा तसा उल्लेख करत आहेत. या सर्व खेळात  शिवसेना अडकलीय. नक्की कोण सेनेचा वापर करत आहेत हे अजून शिवसेनेच्या लक्षात येत नाहीय.  भाजपाला जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ मिळाली होती तेव्हा त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्यासारख "आम्ही विरोधी बाकावर बसणार" म्हणत शिवसेना - राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची अनैसर्गिक यूती होउ दिली.

शिवसेनेच्या हातातून सर्व सुत्र निघून गेली होती. आता सुत्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी खासकरून शरद पवारांच्या हातात आली. शरद पवार साहेब हे असं व्यक्तीमत्व आहे ज्यांना हा देश अजूनही समजू शकला नाहीय. ते काय करतील काही नेम नाही. आणि घडलही तसच .... बैठकावर बैठका होत राहिल्या .. दुसरीकडे शिवसेनेने कसे हिंदुत्व सोडले, त्यांनी कसं दिल्ली दरबारी सोनिया गांधीसमोर झुकले अशा चर्चा सर्वत्र सुरु केल्या गेल्या..

शरद पवार साहेबांच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे हे त्या ब्रह्मदेवालाही ठाऊक नसतं..... शरद पवारांनी अचानक ऐके दिवशी दिल्ली गाठली. मा. पंतप्रधान मोदीजींची भेट घेतली. पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या...
देशभरात शिवसेना - राष्ट्रवादी उध्दव ठाकरे आणि शरद पवारांवर मिम्स आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून टिका होत राहिली. अन ... इथं महाराष्ट्रात शिवसेना - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले. आता या महाआघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित झाले..... दुसरीकडे या अनैसर्गिक आघाडीबद्दल जनतेत रोष वाढवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न सुरुच होते. ...

...... आणि २३ नोव्हेंबरला सकाळी सकाळी बातमी आली... देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली. सारं काही अचिंबित करणार होतं. भल्याभल्यांना याचा सुगावाच लागला नव्हता. अनेक प्रश्न उभे राहिले ... राष्ट्रपती राजवट कधी रद्द झाली ? ज्यांनी आम्ही विरोधी बाकावर बसू अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती त्या भाजपांने सत्ता स्थापनेचा दावा कधी केला गेला ? अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचे समर्थनाचे पत्र दिले कधी ? अनेक अनेक प्रश्न उपस्थित झाले ... शपथविधी तोही गुपचूपपणे पार पडला. भाजपाची ही खेळी सर्वांवर भारी पडली होती.  दिल्लीच्या चाणक्यांची वाह वाह सुरु झाली .....

पण .......

पण जर अजित पवार पुन्हा स्वगृही परतले तर ?
अजित पवारांनी केलेल बंड ही जर शरद पवारांचीच खेळी असेल तर ....?
अजित पवारांना भाजपाकडे पाठवून शपथविधी झाल्यानंतर पुन्हा माघारी आणणे आणि भाजपाला त्यांच्याच खेळीत फसवणे ही पवारांची खेळी असेल तर .. ?
....तर भाजपा तोंडावर पडणार कारण जे असं म्हणत होते की, "आमची सत्ता आलीतर आम्ही अजित पवारांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवू .... काही झाले तरी राष्ट्रवादीशी युती नाही .. नाही... नाही !" ज्यांनी शिवसेनेला दूर ठेवल आणि स्वत: सत्तेच्या लालसापोटी अजित पवारांच्या माध्यमातून केलेली अभद्र युतीची खेळी भाजपाला महागात पडली तर ???

पण हे केव्हा होइल जेव्हा अजित पवार पुन्हा स्वगृही परतले तर शरद पवारांची ही खेळी सिध्दीस जाईल !

पाहू कोणती खेळी सत्यात उतरते ते ....
 




टिप्पण्या

  1. मतदानाआधी दिलेली असवासन विसरुन, जनतेला भ्रमीष्ट ठरवून, जनतेचया भावनेशी खेलून, जनतेनेच म्हणल पाहीजे बाबांनो थांबा आता ,
    शीकलो आंमी सत्ता कशी मिलवायची.
    आमचच चुकल. तुमचा काय दोष.
    तेवड बिचारा शेतकरी आणि कामगारांच बघा.

    यशवंत येलभर. चाकण, पुणे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??