कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती ? काय आहे सत्य ?

१ जानेवारी १८१८ च्या कोरेगाव - भीमा लढाईत पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे.

 चंद्रकांत पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे.

कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली ५०० महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

 महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली, त्यामुळे त्यांचा १८१८ च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही. असा दावा पाटील यांनी केला आहे. गेले पाच महिने आपण जयस्तंभाशी संबंधित इतिहासाचा अभ्यास करत असून खरा इतिहास व छापून आलेला इतिहास यात प्रचंड तफावत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. कोरेगाव भीमाच्या लढाईची २०० वर्ष साजरा करताना इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. ब्रिटिशांनी लिहिलेले ग्रंथ तसेच मुंबई व पुण्याची अर्काइव्ह व अन्य स्त्रोतांचा अभ्यास आपण केल्याची साक्ष पाटील यांनी दिली आहे.

 महसुलाच्या वसुलीवरून पेशव्यांशी असलेले वाद मिटवण्यासाठी ब्रिटिशांच्या मध्यस्थीनंतर बडोद्याच्या गायकवाडांनी गंगाधर शास्त्री यांना पुण्याला पाठवले होते. परंतु १४ जुलै १८१५  रोजी त्रिंबकजी डेंगळे व त्यांच्या माणसांनी शास्त्रींची हत्या केली, असा दावा पाटील यांनी केला. ब्रिटिशांच्या चौकशीत डेंगळे व त्यांचे दोन सहकारी दोषी आढळले. ब्रिटिशांच्या मागणीवरून पेशव्यांनी डेंगळ्यांना त्यांच्या हवाली केले. डेंगळ्यांना ठाण्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले, परंतु तिथून सुटका करून घेत डेंगळ्यांनी साताऱ्याजवळच्या फलटणमध्ये ब्रिटिशविरोधी फौज उभी केली. पेशव्यांकडून मिळालेल्या निधीच्या बळावर जमा केलेल्या या सैन्यामध्ये भिल्ल, मांग, रामोशी, मराठा व अन्यांचा समावेश होता असा दाखला पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान पेशव्यांनी ब्रिटिशांच्या एलफिन्स्टन यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली परंतु एलफिन्स्टन निसटला. ब्रिटिशांच्या ऐतिहासिक कागदपत्रांनुसार ५ नोव्हेंबर १८१७ च्या या घटनेनंतर ब्रिटिश सैन्यानं पेशव्यांचा पाठलाग केला. ३१ डिसेंबर १८१७ रोजी कोरेगावजवळ ब्रिटिशांचं सैन्य व मुख्यत: अरबांचा समावेश असलेलं पैशव्यांचं सैन्य यांच्यात लढाई झाली. पेशव्यांचे ५०० तर ब्रिटिशांचे १११ सैनिक ठार झाले.

१ जानेवारी रोजी पेशवे सैन्यासह साताऱ्याला गेले तर ब्रिटिश शिरूरच्या छावणीत गेले व कुठलंही सैन्य जिंकलं अथवा हरलं नाही असा दावा पाटील यांनी केला आहे. त्यानंतर अनेक महिन्यांनी जून १८१८ मध्ये पेशव्यांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. ब्रिटिश सैन्याच्या पराक्रमाबद्दल जयस्तंभ उभारण्याचा ब्रिटिशांचा पत्रव्यवहारही पाटील यांनी सादर केला असून जयस्तंभाच्या देखभालीसाठी खादोजी मालोजी जामदार यांची नियुक्ती झाल्याचे त्यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडून बुधवारपासून साक्षी नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या जिल्हा परिषदेत आयोगाला कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून सहा ऑक्टोबपर्यंत सतरा प्रतिज्ञापत्रांवर सुनावणी होणार आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाने मे महिन्यात भीमा कोरेगाव, पेरणेफाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला होता. चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी विहित मुदतीमध्ये दाखल प्रतिज्ञापत्रांपैकी सतरा अर्जावर सहा ऑक्टोबपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. उर्वरित अर्जावर पुढील टप्प्यामध्ये सुनावणी घेण्याचे नियोजन आहे.




टिप्पण्या

  1. खरा ईतिहास इतिहासका रांंनी जनतेसमोर योग्य दाखल्यासहित मांडावा जेणेकरून राष्टहित साधल जाईल.
    प्रसारमाधयमंं व पाठयक्रम या माध्यमातून जनतेसमोर खरा इतिहास यावा हिच नम्र विनंती

    उत्तर द्याहटवा
  2. यशवंत येलभर. चाकण, पुणे.
    ,९९२२२१५९७५

    उत्तर द्याहटवा
  3. पाटील यांनी जो इतिहास मांडला आहे तो जरी मान्य केला तरी मग प्रश्न असा आहे की मग युद्धात जे मारले गेले त्यांची नावे स्तंभावर कशी काय आणि फक्त शरणआले म्हणून विजय स्तंभ बांधला हे कितपत खरं आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी आहे की इतिहास संशोधन समिती आहे खरा इतिहास संशोधन करणे कामी नवीन समिती स्थापन करावी व त्यात इतर ही इतिहास अभ्यासक यांचा समावेश असावा असे मला वाटते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??