शिवजयंती कधी साजरी करावी ? तुमच्या अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे...

शिवजयंतीच्या तारखेविषयी आजही अनेक वेगवेगळी मते आहेत. त्याच प्रश्नांवरील सोप्या भाषेतील सोपी उत्तरे ....

प्रश्न - शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ?
उत्तर - शालिवाहन शके फाल्गुन वद्य तृतीया

त्यावेळी इंग्रजी दिनांक काय होती ?
उत्तर - १९ फेब्रुवारी १६३०

त्यावेळी इंग्रजी कालगणना कोणती होती ?
उत्तर - ज्युलियन कालगणना

हे सर्व शिवकालीन तिथी दिनांक आहेत

पण .....

आज आपण कोणती हिंदू कालगणना वापरतो ?
उत्तर आहे - हिंदू कालगणना - जी सनातन कालापासून सुरु आहे 

आज आपण कोणती इंग्रजी कालगणना वापरतो ?
उत्तर - ग्रेगरियन

पुर्वी पाश्चिमात्य इंग्रजी ज्युलियन आणि ग्रेगरियन या दोन कालगणनेत १० दिवसाचे अंतर होत.  म्हणून त्यांनी दोन कालगणने ऐवजी एकच कालगणना सुरु ठेवली ती म्हणजे ग्रेगरियन ज्या कालगणनेशी आपला काहीही संबंध नाही.

ज्या दोन इंग्रजी कालगणनेत १० दिवसाचा फरक होता त्यानुसार ज्युलियन कालगणनेत शिवजन्म १९ फेब्रुवारी ( शिवकाल ) आणि ग्रेगरियन कालगणनेनुसार शिवजन्म १० दिवस पुढे म्हणजे १ मार्चला येतो अस म्हणता येइल
पण .....

शिवछत्रपतींच्या काळात तर हिंदुस्थानात न ज्युलियन कालगणना वापरात होती न ग्रेगरियन ? म्हणून आपण तिथीचाच आग्रह धरतो ....न एक दिवस पुढे न मागे, वर्षानुवर्षं त्याच तिथीला शिवजन्म आलेला, आजही येतो आणि पुढे १००० वर्षानी फाल्गुन वद्य तृतीयेलाच शिवजन्म येइल !

पण जर पुन्हा इंग्रजांच्या मनात त्यांची ग्रेगरियन - ज्युलियन  कालगणना पुढेमागे करायची हुक्की आली तर पुन्हा शिवजन्माच्या दिनांकाचा गोंधळ होइल ...

आता भविष्यात असा गोंधळ आणखी वाढवायचा नसेल तर आपण सर्वांनी हिंदू तिथी म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेलाच श्रीशिवजयंती साजरी करायला हवी !

                       आपला
                बळवंतराव दळवी

 © शिवचरित्र आणि सह्याद्री whtsp समुह

टिप - WP समुहाचे नाव न काढता सदर पोस्ट फिरवावी ही विनंती आहे !



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??