संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ... होय हत्याच आणि तीही अमानुष हत्या औरंगजेबाने केली हे सर्वश्रुत आहेच...
आता संभाजी महाराजांच्या बलिदानाचा माझ्यासारखा एक सामान्य माणूस इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, आपल्या मराठी इतिहासात म्हणजे संभाजी महाराजांच्या समकाळातील इतिहासात आपल्या लोकांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल काहीच लिहून ठेवलेले नाही. जे मुळ लिखाण उपलब्ध आहे ते औरंगजेबाच्या दरबारातील खाफिखान ... साकी मुसैदखान .... ईश्वरदास नागर ... यासारख्या औरंगजेबाच्या पदरी असलेल्या लोकांनीच संभाजी महाराजांच्या अंतिम क्षणाबदल लिहून ठेवले आहे आणि आज ते उपलब्धही आहे.
तुम्ही म्हणाल असं कसं चिटणीस बखर वैगरे मध्ये लिहिले आहे की ... तर मित्रांनो चिटणीस बखर ही मुळातच शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर १०० - १५० वर्षांनंतर लिहिली आहे हे आपण समजून घ्यायला हवे !
एक साधा विचार करा ...
औरंगजेबाच्या दरबारात त्याचे उर्दु फारसी लेखणीक असतील की आपले मराठी लेखनकार असतील ?
समजलं का काही ?
छान .....
म्हणजे आता तुमच्या डोक्यात हा विषय व्यवस्थीत अभ्यासला जातोय तर ...
आता औरंगजेबाच्या दरबारातील त्याच्या समकालीन एक लेखक संभाजी राजेंच्या मृत्युबद्दल 'आलमगीर विजय' या फारशी ग्रंथात ज्याचे मुळ नाव 'फातुहाते आलमगिरी'. याचा लेखक हा औरंगजेबाचा मुख्य न्यायाधिश शेख उल इस्लाम याचा कारकून असलेल्या ईश्वरदास नागर याने हां ग्रंथ लिहिला आहे .
तो लिहितो "बादशाहाच्या आज्ञेवरून इखलासखान व बहादुरखान हे संभाजीराजे , कवी कलश व इतर साथीदारांना घेउन बादशहाच्या छावनीजवळ आले. बादशहाच्या आज्ञेवरुन या सर्वांची उंटावरुन धिंड काढण्यात आली."
यात स्पष्ट लिहिले आहे ...
बादशहाच्या आज्ञेवरुन या सर्वांची उंटावरुन धिंड काढण्यात आली.
चला आता दुसरा पुरावा पाहू ..
मसिरे आलमगिरी अर्थात मराठीत औरंगजेबनामा या औरंगजेबाच्या चरित्राचा लेखक साकी मुसैदखान लिहितो, "संभा को उसकें मुसाहिब कवि कलस समेत जहन्नुम का रास्ता दिखाने के लिए खान के हाथी तक घसीटता ले आया | ..... बादशहा के इकबाल से उस काफिर का कोई मददगार कुछ हातपांव नहीं मार सका | बादशहा ने बडे गुस्से से और मुसलमानी मत के ता ' अस्सुब ' ( धर्मांध होउन ) से हुक्म दिया की, "उस गुमराह को २ कोस से 'तखते कुलाह' ( साखळ दंडाने बांधून ) करके और 'मजहके' ( उपहास होइल असे ) के कपडे पहिना कर तकलिफें देते हुए उंट पर सवार करके, बुरा कहते हुए उर्दुं मे लाबे, जिसे देखने से मुसलमानों को खुशी बढे | ( संभाजी राजांना औरंग्यापुढे आणल्यावर ) .. उस बेदीन का फसाद करना और मुसलमानों के शहरों को लुटना उसके जिंदा रखने से बढा हुआ था, इसलिए शरियतवालों काजियों और मुफ्तियों के फतवा और अमीर वजिरों कि सलाह से उसको ( शंभूराजे ) मारना वाजिब ठहरा | इसलिए कवि कलस समेत काफरों को तलवार से उसको मारा गया |"
वरील सर्व उतारे हे मुळ औरंगजेबनामा या ग्रंथातील आहेत. या मुळ पुस्तकातील वरील उल्लेख पहा. "शरियतवालों काजियों और मुफ्तियों के फतवा' असा स्पष्ट उल्लेख आहे ना ? मग आता मला सांगा फतवा मनुस्मृतीत आहे ? हे फतवे ब्राह्मण काढतात कि मुल्ला मौलवी ?
येतयं ना लक्षात ?
आता आणखी काही संदर्भ पाहू ....
खाफी खान त्याच्या मुतुंखबुलबुल्लाब या औरंगजेबाच्या चरित्रात लिहितो, औरंगजेबाने हुक्म दिला "इन दोनों की जीभें मुहं से निकालकर गालियां देने से बंद करे. ( संभाजी महाराज औरंग्याला अस्सल मराठीतुन शिव्या देत होते ) फिर आंख पपाटों से निकाल ले, इसके साथियों के साथ तकलिफ देकर मार डालें | संभा और कवी कलस के चेहरों की खाल में भुसां भरकर दख्खन के बडे शहरों में फिरायें इन जालिमों की सजा यहीं है |
हाच तो खाफीखांन ज्याने त्याच्या पुस्तकात, 'लढाईत शत्रूकडील कुराण सापडले तर शिवछत्रपती ते मानाने परत करतात.' हाच खाफीखां वर काय लिहितो ? औरंगजेबाने हुक्म दिला कोणी दिला हुक्म? ब्राह्मणांनी नाही दिला... तर औरंगजेबाने दिला बरोबर ना ??
चला आता आणखी काही समकालीन नोंद पाहू ....
आर्मच्या संग्रहातील नोंद -
"मुरांच्या छावणीतील बातमी अशी आहे की, मोगली सैन्याने संभाजीस अकस्मातपणे पकडून मोगलाजवळ कैद करून नेला. त्याला उंटावर बसवून धिंड काढली. त्याचे डोळे काढले व शिरच्छेद केला आणि 'बंडखोर म्हणून' त्याच्या छावणीचा धुव्वा उडविला."
हे सर्व औरंगजेबाच्या दरबारातील समकालीन पुरावे. एकाने तरी मनुस्मृतीचा किंवा ब्राह्मणांचा उल्लेख केला आहे काय ?
आता शेवटी हे वाचा ....
ज्यांनी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांच्या चरित्राला न्याय दिला ते इतिहास संशोधक वा. सि. बेंद्रे त्यांच्या श्री छत्रपती संभाजी महाराज या चरित्रात पान क्र. ६६३ ते ६६९ यावर लिहितात, "११ मार्चला संभाजीराजांस हाल हाल करुन ठार मारले. शिर कापून त्याचे प्रदर्शन करून हिंदूत घबराट उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला . शंभूराजांना अमानुषपणे मारण्यात जरी मुसलमान सरदारांनी सुडबुध्दी दाखवून औरंगजेबास खुश करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा परिणाम मोगली सैन्याच्या हालचालीस पोषक झाला नाही उलट त्यामुळे संभाजी राजांच्या उज्ज्वल चारीत्र्याची जाणीव झाली. "

वा. सि. बेंद्रे काय लिहितात....
"हिंदूत घबराट उत्पन्न करण्यासाठी .... मुसलमान सरदारांनी सुडबुध्दी दाखवली"
आता मला सांगा एवढे सगळे पुरावे मी इथे दिले. ब्रिगेड किंवा बामसेफी झुरळ असे पुरावे देतात काय ? एकही नाही ... एक तरी समकालीन पुरावा द्या ज्यात मनुस्मृतीचा उल्लेख असेल असा... पण नाही देणार ... अहो, पुरावा असेल तर देणार ना ?
नुसती फेकमफाक ... काय तर म्हणे औरंगजेबाने ब्राह्मणांच्या सांगण्यावरून संभाजीराजांना मारले. मी वर अस्सल समकालीन पुरावे देउन हे सिध्द केले आहे की संभाजी महाराजांची हत्या त्या नीच औरंग्यानेच केली आहे !
मी त्या सर्व ब्रिगेडि आणि बामसेफच्या वक्त्यांना / इतिहास अभ्यासकांना उघड आव्हान करतो. संभाजी महाराजांना औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार किंवा ब्राह्मणांच्या सांगण्यावरून मारले असा एक तरी समकालीन पुरावा द्या.
आहे कोणी असा अभ्यासक जो माझं हे आव्हान स्विकारेल ?
वाट पाहतोय .... !!!
- बळवंतराव दळवी
( शिवचरित्र अभ्यासक )
खूप छान माहिती
उत्तर द्याहटवाराजेश भाऊ आसी संदर्भासहित माहिती आपण पाठविली खूप खूप धन्यवाद सुपारी बहाद्दर लेखक व वक्त्यांना ही चांगलीच चपराक आहे. आसीच माहीती व्हाट्सअप वरही पाठवा....
हटवाकोणत्याही घटनेबाबत लिखित संदर्भ जेव्हा सापडतात, त्यावरून घटनेची सत्यता तपासता येते. आपल्याला काय वाटते किंवा आपला कयास, तर्क तिथे काम करत नाही. असे अनेक स्वयंघोषित लेखक, अभ्यासक आज लोकांना संभ्रमित करीत असतात.
उत्तर द्याहटवाआपण वर संदर्भासहित माहिती दिलेली आहे, त्याचे वाचन, अवलोकन करून लोकांनी अपडेट व्हावे.
जय शिवराय
उत्तर द्याहटवाजय शंभुराजे 🚩🚩