तिसरी पिढी

असं म्हणतात की, एखाद्या थोर व्यक्तीची  'तिसरी पिढी' त्या व्यक्तीचे ध्येयधोरणे, त्या व्यक्तीचा लढा, त्या व्यक्तीचे कार्य जसेच्या तसे पुढे नेण्यात असमर्थ ठरते किंवा मग त्या थोर व्यक्तीच्या विचारांच्या विरोधात जाते.  याला असंख्य उदाहरणे आहेत. अगदी श्रीशिवछत्रपती ते शाहू महाराज हा इतिहास पाहिल्यावर आपल्याला हे दिसून येते. शाहू महाराज यांनी आपली राजधानी कोणत्याही किल्ल्यावर न करता साताऱ्यात ते स्थायिक झाले आणि तिथेच आपली राजधानी केली. किल्ले रायगडाचे महत्व कमी होउ लागले ते यानंतरच .... मराठ्यांची सत्ता अटकेपार गेली पण त्यात साताऱ्याचे शाहू महाराजांचा प्रत्यक्ष  सहभाग किती ते अभ्यासल्यावर तुम्हाला लेखकाला काय म्हणायचं आहे हे समजेल कारण पुढचा इतिहास सर्वांना ठाऊक आहेच ... 



सध्या देशात गांधी घराण्यातील कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण यावरून मोठा गदारोळ माजला आहे. इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी पण त्यांच्या नंतर तिसरी पिढी मात्र कमकुवत निघाली. राहुल गांधींना आपल्या वडिलांसारख, आपल्या आजी सारख कॉंग्रेस संभाळणे वाढवणे जमत नाहीय याचा प्रत्यक्ष पुरावा उभा देश पाहात आहे.



असेच एक महाराष्ट्रातील कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उध्दव ठाकरे यांनी कारभार सांभाळला पण त्यांच्यानंतरची तिसरी पिढी आदित्य ठाकरे मात्र page 3 च्या पार्टीत अडकलेले दिसत आहेत. अनेक तरुण शिवसैनिक उघडपणे आदित्य ठाकरेंनी कधीही न घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याबद्दल बोलताना दिसून येतात. आणि ते काही अंशी सत्यही आहे. आजतागायत आदित्य ठाकरे ज्या पध्दतीने Night life बद्दल भूमिका घेताना दिसतात तशी भूमिका ते हिंदुत्वाचा मुद्दा घेउन पुढे आलेले दिसत नाही .... आदित्य ठाकरे आपल्या आजोबांचा हिंदुत्वाबाबतचा कोणता गुण घेतात हे भविष्यात पहायला मिळेल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे !



असेच आणखी एक प्रसिद्ध कुटुंब परिवार म्हणजे पवार घराणे ...... महाराष्ट्रासह देशात शरद पवारांनी आपलं राजकीय वर्चस्व अजूनही अबाधित ठेवले आहे. त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार या दोघांनी त्यांच्या त्यांच्या राजकीय क्षेत्रात आपलं एक वेगळ स्थान निर्माण केल आहे. पण पवारांची तिसरी पिढी मात्र तो वारसा जपण्यात कमी पडताना दिसत आहे. त्यात पार्थ पवारांचा लोकसभेत झालेला दारूण पराभव आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या आजोबांनी "मी माझ्या नातवाच्या वक्तव्याला किमत देत नाही असं जाहीरपणे म्हणून पवारांची तिसरी पिढी पवारांचा वारसा पुढे चालवण्यास समर्थ आहे काय यावर प्रश्न उभा करून गेलं. 



डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर मुळच्या बौध्द धर्मात जे कधीही नव्हतं अशा नवीन नियम प्रतिज्ञा तयार करून हिंदू देवदेवतांना नाकारून बौद्ध धर्म स्विकारला होता. आज त्यांचेच नातू आजोबांच्या ध्येयधोरणांना बगल देत कधी विठ्ठल रखुमाई मंदिरात तर कधी इतर  कोणत्या हिंदू मंदिरात जाताना अनेकदा दिसून आले आहेत. आणि ते चुकीचे आहे असेही कोणी म्हणत नाहीय ! न त्यांना कोणत्याही बौद्ध नेत्यांकडून किंवा एखाद्या बौद्ध संघटनाकडून विरोध होताना दिसत नाहीय ... ही कदाचित येणाऱ्या नविन विचारांची नांदी असावी ...... हिंदू धर्माला, त्याच्या रुढीपरंपरेला,  हिंदूच्या सणांना, देवदेवतांना मानणाऱ्या कोणी का असेना अशांना हिंदू त्या व्यक्तीला आपलं मानतो ..... जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर खरचं हिंदू धर्माला इतकं मानत असतील तर हिंदू धर्मीय लोकं सुद्धा त्यांना नक्कीच मान आदर देतील याबद्दल शंका नाही..... 


हिंदू धर्मातील रुढीपरंपरा मानणाऱा बौद्ध बांधव आजही आपल्या घरी गणपती आणण्यासाठी तयार असतो पण काही धर्माचे ठेकेदार त्यांना तस करु देत नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जातो, त्यांना समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली जात आहे ... अशावेळी प्रकाश आंबेडकरांनी उचलले पाऊल पाहता भविष्यात बौद्ध समाजाता नव्याने रुजणारा विचार पुरोगामी महाराष्ट्रासाठी क्रांतिकारी ठरेल हे निश्चित आहे !



तिसरी पिढी भविष्यकाळ उज्वल करेल की महाराष्ट्रसह देश खड्यात घालेल हे येणारा काळच सांगणार आहे .....




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??