गर्व है... हम हिंदू है !

"....त्यामुळे राम मंदिरचे महत्त्व आमच्यासाठी काय आहे हे शब्दांत सांगणे कठीण"
                          
                                       - बाळा नांदगावकर 
                                           ( नेते - मनसे )

                
आज श्रीराममंदिराचे भूमिपूजन होत आहे, करोडो लोकांचे , अनेक पिढ्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. परंतु हा दिवस येण्यामागे लाखो लोकांचा संघर्ष आहे, आणि मला अतिशय गर्वाने नमूद करावेसे वाटते की त्यात माझा ही खारीचा वाटा आहे. मुंबई महापालिकेचा नगरसेवक असतांना १९९२ मधे बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही त्यावेळचे सहकारी नगरसेवक सुभाष कांता पाटील, दिगंबर कादंरकर, जयवंत परब, के पी नाईक, श्रीकांत सरमळकर, विलास अवचट, विश्वनाथ नेरुरकर, अनंत भोसले असे आम्ही सर्व कारसेवक म्हणून सामील झालो. प्रथम फैसाबाद येथे गेलो व तिथून बसने अयोध्या कडे मार्गस्थ झालो. अतिशय तंग असे वातावरण त्यावेळी होते, कोणत्याही क्षणी कुठूनही हल्ला होण्याची, पोलीसांचा गोळीबार होऊन जिव जाण्याची शक्यता ही त्यावेळी होती. परंतु एक अतिशय वेगळेच स्फूर्ति दायक वातावरण त्यावेळी होते व त्यासमोर ही मरणाची भिती आम्हाला कुठेही जाणवली नाही. तसेच थेट विवादित ढाचा पाडण्यात जे अग्रेसर होते त्यापैकी एक असण्याचे भाग्य मला लाभले, त्यामुळे राम मंदिर चे महत्त्व आमच्यासाठी काय आहे हे शब्दांत सांगणे कठीण. विवादित ढाचा जमीनदोस्त करून तेथून निघतांना ज्या विटा तिथे मंदिरासाठी जमा झाल्या होत्या त्यातील २ विटा आठवण म्हणून मी सोबत घेऊन निघालो. काही काळाने माझंगाव कोर्टाच्या बाजूला शिवसेनेच्या नवीन कार्यालयाच्या पायाभरणीच्या वेळी त्या २  विटा आम्ही तेथे ठेवल्या. आता तिथे सध्या शिवसेनेची शाखा आहे. आज हे सर्व आपणासमोर ठेवण्याचे कारण की ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसेच रामजन्मभूमी शी हे थेट "रक्ताचे" नाते असल्याने या भूमिपूजनाचे महत्त्व काही औरच आहे. 

मागे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर राजसाहेब बोलले होते, की आज बाळासाहेब असायला हवे होते, खरंच अगदी तिच भावना आज सर्वांची आहे. राजसाहेब सुद्धा सुरवातीपासून हेच जाहीर सभेत व अनेक ठिकाणी कायम बोलत आले की राममंदिर व्हायला च हवे व भव्य असेच व्हावे. युतीच्या अगदी सुरवातीच्या काळात एक घोषणा घरोघरी पोहचली होती की, गर्व से कहो हम हिंदू है" पण आज हा एक अध्याय पूर्ण होत असतांना व याची देही याची डोळा राममंदिर आपण सर्व जण लवकरच पाहणार आहोत व त्या अनुषंगाने माझ्या मनात एक नविनच घोषणा अनेक दिवसांपासून येत आहे व ती म्हणजे
"गर्व हे हम हिंदू है". 

सर्व धर्माचा व धर्मियांचा सन्मान आपण कायमच राखतो व राखूच, परंतु हे करतांना आपल्या "हिंदू" धर्माचा ही आपणांस अभिमान हा असलाच पाहिजे. उगाच धर्मनिरपेक्षतेच्या (Secularism) नावाखाली आपल्याच धर्माची खिल्ली उडविणे हे अतिशय घृणास्पद असेच आहे. 

बाळासाहेबांमुळेच एवढे मोठे पुण्याचे काम कारसेवक म्हणून करता आले त्याबद्दल त्यांचा मी कायमच ऋणी आहे व राहील. आपणा सर्वांना या भूमिपूजनाच्या सोनेरी क्षणाच्या निमित्त खुप खुप शुभेच्छा.

जय श्रीराम

आपला नम्र
बाळा नांदगावकर



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??