शेकडो पाकिस्तानी आणि खलिस्तानवाद्यांना नडला एकटा भारतीय

जर्मनीत भारताविरोधात आणि खलिस्तानच्या मागणीसाठी पाकिस्तानी आणि खलिस्तानवाद्यांनी शेकडोंच्या संख्येंने एकत्र येउन मोर्चा काढला होता. पण या मोर्चाला हाती तिरंगा घेउन एक भारतीय नडला.


काश्मीरच्या मुद्यावर जगसमोर तोंडावर आपटल्यानंतर आता पाकिस्तानकडून खलिस्तानवादी आंदोलकांना पाठबळ देण्याचे पुन्हा प्रयत्न सुरु आहेत. परदेशातील पाकिस्तानी नागरीक खलिस्तानीवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी जर्मनीत १५ ऑगस्ट रोजी खलिस्तानसाठी रॅली काढली होती.


  या मोर्चाला प्रशांत वेंगुर्लेकर या भारतीयाने एकट्याने सामोरे जाताना आपल्या हाती भारताचा तिरंगा घेऊन "बाप बाप होता है" अशी अभिमानाने प्रतिउत्तर देणारा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  भारताला विरोध दर्शविण्यासाठी शेकडोंच्या संख्येने मोर्चेकरी तिथे असताना  प्रशांत वेंगुर्लेकर हा भारतीय मोर्चा जात असलेल्या रस्त्यावर एकटा उभा राहून 'भारत माता की जय, सारे जहां से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' सारख्या घोषणा देत उभा होता. या घोषणांमुळे काही मोर्चेकरी त्याच्या अंगावरही धावून गेले. काही मोर्चेकऱ्यांनी घेराव करण्याचा, हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत मोर्चेकऱ्यांना दूर केले.


प्रशांत वेंगुर्लेकरने हा व्हिडिओ स्वत: ट्विट करत त्याची माहिती दिली. फ्रँकफर्ट येथील भारतीय दूतावासामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला हजेरी लावून येताना प्रशांतला हा मोर्चा दिसला. त्यावेळी भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थनाच्या घोषणा सुरू होत्या. भारतविरोधी घोषणा सुरू असताना प्रशांतने तिरंगा हाती घेऊन शेकडो मोर्चेकरांसमोर भारताच्या समर्थनात घोषणा दिल्या.


प्रशांत वेंगुर्लेकरांचा हा video समाज माध्यमांवर प्रचंड वायरल झाला असून प्रशांतचे सर्वस्तरावर कौतुक केले जात आहे ! असे पुत्र व्हावे आता मायभूला !




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??