मिळालेली संधी - कथा व बोध

आटपाट नगरातील एका गावात एक पुरातन मंदिर होतं. त्या मंदिराचा वयोवृद्ध पुजारी तो करत असलेल्या धर्मकार्याबद्दल आजूबाजूच्या अनेक गावात प्रसिद्ध होता. पुजाऱ्याची देवावर अपार श्रद्धा भक्ती होती. गावातील लोकं त्या पुजाऱ्यांना खूप मानत... गावात काही अडिअडचण आली की पुजाऱ्याने सांगितलेले उपाय करून संकट दुर करण्यासाठी प्रयत्न केले जात. अशाच एका पावसाळ्यात गावाशेजारील नदीला अचानक पूर आला. नदीचे पाणी गावात शिरायला लागले. लोकं आपआपले सामान वाचवण्यासाठी धडपड करु लागले. पाणी वाढत गेले. पुर्ण गाव पाण्याखाली जाणार अशी भिती वाटू लागली. गावातील काही लोकं मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांकडे पोहचली. वयोवृद्ध पुजाऱ्यांना वाढणाऱ्या पुराबद्दल गावकऱ्यांनी सांगितले... "पुजारीबाबा, मंदिरातून बाहेर पडा. पुराचे पाणी वाढायला लागले आहे." "मी हे मंदिर सोडणार नाही. माझा देव मला या संकटातून वाचवेल. तुम्ही जा !" पुजारीने गावकऱ्यांना उद्देशून म्हटले. गावकरी नाईलाजाने परतले. पाहतापाहता पुराच्या पाण्यात मंदिराच्या पायऱ्या दिसेनाशा झाल्या. गावकऱ्यांना पुजारी बाबांची चिंता लागून होती. त्यांनी ही गोष्ट बचावकार्य...