पॅकेजवाले पत्रकार

आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींना नाहक बदनाम करण्यासाठी २०१६ पासून अत्यंत फालतू बोगस पत्रकारांची एक मोठी टीम मिळणाऱ्या पैशासाठी हाती आलेले पॅकेज News चालवून गुरुजींची बदनामी करत आले आहेत.


अत्यंत फालतू पत्रकारिता करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारी लोक समाजात उदयास आली आहेत. कोणत्यातरी वर्तमापत्रात टेंपररी ( घरात बसून खर्डेघाशी पत्रकारिता ) करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेत ही लोक हाती आलेले पॅकेज सातत्याने पसरवून बिनधास्तपणे खोटे पसरवत असतात.


उदाहणादाखल -
 १) २०१६ सालीे लोअरपरळ येथे एका शाळेच्या भल्या मोठ्या सभागृहात किमान दिड हजार शिवभक्त सलग तीन तास भिडे गुरुजींचे व्याख्यान सुरू असताना एका संघटनेत ज्यात पुरूष नसावेत म्हणून त्यांनी काही स्त्रियांना गुरुजींच्या व्याख्यानात व्यत्यय आणण्यासाठी पाठवले असताना त्यांना आम्ही अत्यंत आदराने सभागृहाबाहेर नेले असताना अवघ्या काही मिनिटांत एक बातमी काही online वर्तमानपत्रांमधून पसरवली गेली. या बातमीचा मथळा थोडा वेगळा असला तरी बातमी एकच होती. "भिडे गुरुजींना वर्गात कोंडल" 'भिडे गुरुजींना खोलीत कोंडल' अमुक संघटनेच्या लोकांनी सभा उधळली वैगेरे वैगेरे .... अशा मथळ्याखाली खोटी बातमी त्या भिकारड्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. ज्याला सत्याचा नव्हे तर एका Whatsup post चा आधार दिला गेला होता ही त्यांची पत्रकारिता...

जेव्हा त्या सर्व वर्तमानपत्राच्या कार्यालयावर धारकऱ्यानीं धडाका दिल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत बातमी बदलली होती. 


२) आधी नाशिक येथे झालेल्या व्याख्यानात आदरणीय भिडे गुरुजी जे आंबे प्रकरणावर बोलले ते पूर्ण वाक्य न दाखवता आणि अगदी तसेच पुणे येथे वारकरी धारकरी संगमावेळी झालेल्या व्याख्यानात आदरणीय गुरुजींनी बोललेल्या मनुबद्दल ( मनुस्मृती बद्दल नव्हे ) पूर्ण वाक्याला अर्धवट दाखवून जो काही एकसमान पॅकेज video सर्व News माध्यमांवर दाखवला गेला होता ते पॅकेज आरोप बिनबुडाचे होते हे माहिती असूनही मिळालेल्या पॅकेटसाठी सातत्याने खोटं बोलून आदरणीय भिडे गुरुजींची नाहक बदनामी केली होती. 


या अशा  पॅकेजसाठीच ही पत्रकार मंडळी बिनधास्तपणे एका शिवतपस्वीची बदनामी करत होते...


३) कोरेगाव -भीमा दंगल झाली तेव्हाही आदरणीय भिडे गुरुजी हे सांगलीला राष्ट्रवादीच्या जयंतराव पाटील यांच्या मातोश्रींच्या मातीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते जे संपूर्ण सांगलीने पाहिले होते ... तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रात तशी बातमीही छापून आलेली असताना या सर्व गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून काही पत्रकारांनी ठरवून किंवा त्यांना मिळालेल्या आदेशाला शिरसावंद्य मानून शिवतपस्वी भिडे गुरुजींना कोरेगाव भीमा दंगलीचा मास्टर माइंड ठरवुव त्यांच्या विरोधात News वर अत्यंत निंदनीय भाषेत बातम्या देण्यास सुरुवात केली होती आणि सातत्याने भिडे गुरुजींची बदनामी केली.  पुणे महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासात भिडे गुरुजी त्यावेळी तिथे उपस्थित नसल्याचे सिध्द झाले. दिल्लीहून आलेल्या NIA टिमनेही भिडे गुरुजींना क्लिनचिट दिली...

परंतु दुसऱ्या बाजूला काही पॅकेज / पाकिट मास्टर पत्रकारांनी सत्य समोर आलेले असतानाही भिडे गुरुजींची बदनामी सुरुच ठेवली. 



अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे एकच video सर्व माध्यमांवर दाखवल जातो अगदी कट टू कट तितकाच .... लोक आता या पॅकेजवाल्या पत्रकारांना चांगलेच ओळखू लागले आहेत. अशा काही पत्रकारांनी सच्च्या पत्रकारांचीही मान खाली घातली आहे हे दुर्दैवी हे !
© http//divyadrushti.blogspot.com 2020


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??