छत्रपती उदयन महाराजांनी खडा पहाऱ्याचे कौतुक केले

४ जून २०१७ रोजी किल्ले रायगडावर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी त्यांच्या लाखों धारकऱ्यांच्यासह शिवछत्रपतींचे ३२ मण सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापित करण्यासाठी 'हिन्दवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापन संकल्प' केला होता. या दिवशी महाराष्ट्रभरातून लाखो शिवभक्त धारकरी किल्ले रायगडावर पोहचले होते. 
हे सुवर्ण सिंहासन लोकसहभागातून उभे केले जाणार आहे. जेव्हा हे ३२ मण सुवर्ण सिंहासन किल्ले रायगडावर पुन्हा स्थापित केले जाणार आहे त्यानंतर त्या सिंहासनाच्या सुरक्षेची जबाबदारी ही महाराष्ट्रातील ३६० तालुके वर्षभरातील दररोज एक दिवस प्रमाणे किल्ले रायगडावर त्या सुवर्ण सिंहासनाच्या सुरक्षेसाठी जातील यालाच 'खडा पहारा' असे संबोधले गेले आहे.

दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांनी सांगलीत भेट दिली असता उदयन महाराजांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नितीन चौगुले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी नितीन चौगुले यांनी उदयन महाराजांना श्रीरायगडावर होणाऱ्या ३२ मण सुवर्ण सिहासंनाच्या खडा पहारा तुकडी संदर्भात माहिती दिली व शिवभक्त धारकऱ्यांनी स्वतःचे रक्ताचे ठसे देऊन केलेली नोंदणी दाखवली त्यावेळी उदयन महाराजांनी कौतुकाची थाप मारून खडा पहारा तुकडीच्या यादीवर शुभेच्छा रुपी स्वाक्षरी केली !

उदयन महाराज आणि संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यातील शिवछत्रपती प्रेम आणि या दोघांमध्ये असलेल्या नात्याबद्दल महाराष्ट्राला नवं काही सांगायला नको. भीमा कोरेगाव दंगलीत जेव्हा भिडे गुरुजी यांचे नाव गोवण्यात आले होते तेव्हा उदयन महाराजांनी उघडपणे भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ आपलं मत मांडले होते.  तसेच २ जून २०१२ रोजी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर असलेल्या शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ मुर्तीवर छत्ररोहणाचा कार्यक्रम श्रीशिवप्रतिष्ठान तर्फे भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केला गेला होता त्यावेळी उदयन महाराजांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मुर्तीवर छत्र बसवले गेले होते. 

छत्रपती उदयन महाराजांनी किल्ले रायगडावर पुर्नस्थापन होणाऱ्या सुवर्ण सिंहासन आणि खडा पहाऱ्याकरता शिवभक्तांना आशिर्वादपर शुभेच्छा दिल्यानंतर शिवभक्तांमध्ये आणि शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले !

© divyadrushti.blogspot.com 2020

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??