गरुडांची उंच भरारी आणि कावळे

गरुड आणि कावळ्याची ही कथा आपल्याला नवीन विचार नक्कीच देउन जाईल अशीच आहे ..... कावळा हा एकमेव असा पक्षी आहे, जो गरुडाच्या पाठीवर बसून त्याला चावा घेण्याचे धाडस करू शकतो, मात्र कावळ्याच्या या त्रासाकडे गरूड दुर्लक्ष करतो आणि त्याच्याशी लढण्यात आपला वेळ किंवा शक्ती खर्च करत नाही, मात्र आपले भक्ष्य शोधण्याचे काम करण्यासाठी तसेच कावळ्याला अद्दल घडवण्यासाठी गरूड पंख पसरून आकाशात झेप घेतो. उंच आकाशात गरुडझेप घेतल्यावर त्याच्या पाठीवर बसलेल्या कावळ्याला ऑक्सिजनच्या अभावामुळे श्वास घेणे कठीण होते व त्यामुळे कावळा खाली कोसळतो. आपल्या आयुष्यात देखील काही लोक त्यांच्या परीने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या प्रत्येक टोमण्याला, त्रासाला प्रत्युत्तर देण्यात किंवा आपल्या समर्थनार्थ युक्तीवाद करण्यात आपला वेळ आपण वाया घालवू नये, कारण जे तुमच्या सोबत असतात ते तुम्हाला घडवत असतात आणि जे शत्रू असतात त्यांना तुमचे मनस्वास्थ्य बिघडवायचे असते. त्यामुळे आपल्या कामातून, यशातून ( गरुड बनून ) त्या विरोधकांना ( कावळ्यांना ) उत्तर द्यावे ! हाच या प्रतीकात्मक कथेतील मतीतार्थ आहे ... कावळ्यांना त्यांचे काव काव करण्याचे काम करु द्या .. गरुडांना आणखी उंच भरारी मारायची आहे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??