तांडव सिरिज आणि हिंदूचा उशीरा जागे होण्याचा प्रकार
तांडव सिरिज आणि हिंदूचा उशीरा जागे होण्याचा प्रकार
तत्पर धारकऱ्यांनी केलेली कृती.....
२४ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांच्या मोबाईलवर एक छोटी पोस्ट आली होती. आणि ती वाचून त्याबद्दल पुर्ण शहानिशा केल्यावर दुसऱ्याच दिवशी दि. २५ फेब्रुवारी २०१७ शनिवारचा दिवस होता ... मुंबईतील आदरणीय भिडे गुरुजींचे धारकरी विलेपार्लेस्थीत Colours मराठी चॅनलच्या कार्यालयात धडकले होते. याला कारण होते .. हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा ( भविष्यात म्हणजे दोन दिवसांनंतर म्हणजेच २७ - २८ फेब्रुवारी २०१७ रोजी कलर्स मराठीच्या चॅनलवर ) होणारा अवमान रोखण्यासाठी ...!
कलर्स मराठी चॅनलच्या Too 2 Mad या कार्यक्रमात छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा असा अफजल वध विषयावर नृत्य प्रसारित होणार होते ... हा प्रसंग जसा घडला तसा दाखवला असता तर शिवभक्तांना आनंदच होणार होता .. परंतु.... हे दाखवताना शिवछत्रपती - अफजलखान यांचे एकत्रित नृत्य ( डांस- ) दाखवून कलर्स चॅनल शिवछत्रपतींचा अवमान करत होते .... शिवछत्रपती आणि अफजलखान एकत्र नाचताना डांस ??? कशी ही बुध्दी होते या चॅनलवाल्यांची ?? हा अवमान शिवभक्त कधीही सहन करणार नव्हते.. !
मुख्य कार्यालय शनिवार रविवार बंद असल्याने तिथल्या एका अधिकाऱ्याला धारकऱ्यांनी स्पष्ट चेतावनी दिली, "तुम्हाला दाखवायचा असेल तर अफजलखान वधावरचा पोवाडा दाखवा .. पण तुमच्या TRP वाढविण्याच्या नादात जर तुम्ही शिवछत्रपतींना नाचविण्याचा प्रयत्न कराल तर तो प्रयत्न समस्त शिवभक्त हाणून पाडतील.
आणि तुम्हाला हे सांगूनही जर हे नृत्य प्रसारित झाले तर पुढील घडणाऱ्या गोष्टीस तुम्हीच जबाबदार असाल !"
शिवप्रतिष्ठानचे धारकरी फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. धारकरी तत्परतेने तडक विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोहचले होते. तिथे कलर्स चॅनलचे हेड यांना पोलिसांनी फोन करून सर्व प्रकार सांगितला 'जर ते नृत्य प्रसारित झाले तर शिवभक्त नाराज होतील यामुळे तुम्ही ते नृत्य दाखवू नका !' चॅनल हेडने जबाबदारी घेत 'ते नृत्य प्रसारित होणार नाही' याबद्दल हमी दिली.
मुंबईतील धारकऱ्यांना ही छुपी बातमी जिथून मिळाली होती तिथून आणखी एक गोष्ट समजली होती ती म्हणजे जेव्हा या अवमानकारक नृत्याचे शूटिंग सुरु होते त्यावेळी त्याच मंचावर दुनियादारी फेम डायरेक्टर श्री. संजय जाधव आणि आणखी एक कलाकार या कार्यक्रमाचे जज होते.... दुर्दैवाने या मराठी माणसांसमोर शुट झालेले हे नृत्य त्यांनी तेव्हाच थांबवायला हवे होते .... पण चॅनलच्या दबावामुळे ते त्यावेळी काही करु शकले नाही..... हे कळताच संजय जाधव यांना धारकऱ्यांनी फोन करून आपला रोष व्यक्त केला. "तुम्ही एक मराठी माणूस आहात तुमच्या समोर शिवछत्रपतींना नाचविताना दाखवलं गेलं आणि तुम्ही ते शांतपणे पाहात होता ? तुम्ही ते तेव्हाच का नाही थांबवलं ? त्यावेळी संजय जाधव यांनी 'क्षमा करा चॅनल पुढे आमचं काही चालत नाही. पण तुम्ही दिलेले निवेदनाबद्दल आम्हाला समजल आहे आणि तुम्हाला खात्री देतो ते नृत्य दाखवले जाणार नाहीय. आता चॅनलनेही तस आम्हाला कळवल आहे." असं म्हणत "झालेला प्रकार नक्कीच चुकीचा होता. यापुढे असं काही होणार नाही याची ग्वाही देतो आणि मी वैयक्तिक शिवभक्तांची क्षमा मागतो !"
आता येउ आपण मूळ विषयावर ........ सध्या सुरु असलेल्या तांडव या सिरीजवरचा वाद .....
जर २०१७ ला कलर्स चॅनलने जेव्हा विवादास्पद नृत्य शूटिंग केले होते तेव्हा त्याच ठिकाणी असलेल्या एका मराठी शिवभक्ताने ही गोष्ट लपून का होइना पण बाहेर पसरवली होती म्हणून ते शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या नृत्याला ऐनवेळी विरोध झाल्यामुळे ते प्रसारितच झाले नाही.... तर मग तांडव ही सिरीज जेव्हा शुट केली जात होती आणि त्यात ते वादग्रस्त चित्रण केले गेले होते तेव्हाच जर त्याच्या विरोधात एकाने तरी ही गोष्ट लपूनछपून का होइना पसरवली असती तर तेव्हाच त्यालाअ विरोध झाला असता आणि आज ते विवादास्पद चित्रण लोकांच्या समोर आलेच नसते ....... दुर्दैव असे की त्या सिरीज मध्ये एकही हिंदू नव्हता ?? होते .... होते मग का नाही त्यांनी त्याला विरोध केला ? इतकं पैशासाठी लाचार ?? मुसलमान प्रोड्यूसर असला म्हणून काय हिंदूनी विरोधच करायचा नाही काय ?
यापुढे कोणत्याही चॅनल ... प्रोडुसर ... कोणत्याही डायरेक्टर पुढे नमत न घेणारे हिंदू फ्लिम इंडस्ट्रीज मध्ये असायला हवेत .... जर मुसलमानांच्या कुराण किंवा त्यांच्या हजरत महम्मद पैंगबरां विरोधात असा कोणताही चित्रपट किंवा Online सिरीज दाखवली गेली असती तर चित्र काय असतं हे वेगळ सांगायला नको .......
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबईतील आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी जी कृती ते वादग्रस्त चित्रण प्रसारित होण्याआधी केली होती तीच तत्पर कृती प्रत्येक हिंदूधर्माभिमानी व्यक्तीने करायला हवी ....... वेळीच काही गोष्टी थांबवा ... वेळ निघून गेल्यानंतर छाती बडवण्यात काय अर्थ ??
@divyadrushti.blog.com 2021
खरंच आहे....एका ने तरी छुप्या पद्धतीने बाहेर बोलायला हवं
उत्तर द्याहटवा